आखिल भारतीय ग्राहक पंचायतचे कर्जत तालुकाध्यक्षपदी प्रा. सुनिल गोरे तर सचिवपदी प्रा. संतोष गलांडे



कर्जत / भगवान गायकवाड,
ग्राहकांचे हक्क अबाधित राखण्यासाठी कार्यरत असलेल्या आखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या नूतन कार्यकारणीची अधिकृत निवड जिल्हाध्यक्ष शाहूराव औटी (सर )यांच्या अध्यक्षतेखाली ग्राहक पंचायतची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. होती.यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत कर्जत तालुकाध्यक्षपदी प्रा.सुनील गोरे तर सचिवपदी गलांडे संतोष यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष शाहूराव औटी सर, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा प्रा.अमिता कोहली, ज्येष्ठ मार्गदर्शक हरिभाऊ चौधरी सर, पारनेर तालुका सचिव दत्तात्रय औटी सर, आदी मान्यवर उपस्थित होते.

  जिल्हाध्यक्ष प्रा.शाहुराव औटी सर यांच्या अध्यक्षतेखाली हि बैठक पार पडली. या निमित्ताने तालुक्यातील ग्राहक चळवळीला नवीन दिशा आणि बळ मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त केला. तसेच ग्राहक हा प्रत्येक व्यवहाराचा केंद्रबिंदू आहे. त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे हिच खरी जबाबदारी आहे. त्यामुळे संघटनेच्या माध्यमातून लोकांच्या अडीअडचणींना आवाज मिळेल.

       यावेळी कर्जत ग्राहक पंचायत तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली.यामध्ये तालुकाध्यक्षपदी प्रा.सुनिल गोरे, सचिवपदी प्रा.संतोष गलांडे,उपाध्यक्ष अनारसे रामचंद्र भाळाराम, उपाध्यक्ष गदादे युवराज शिवाजी, कोषाध्यक्ष बागडे ओंकार किशोर, सहसचिव प्रा.रासकर सागर शिवाजी, सहसचिव जाधव, अंबादास, तालुका प्रसिद्धी प्रमुख विनायक चव्हाण आदींची नियुक्ती करण्यात आली.

बैठकीचे सूत्रसंचालन प्रा.गलांडे संतोष यांनी केले तर आभार बागडे ओंकार मानले.
Exit mobile version