आमदार काशिनाथ दाते यांच्या उपस्थितीत पारनेर तालुक्यात ११० बांधकाम कामगारांना गृहपयोगी साहित्याचे वाटप

पारनेर / प्रतिनिधी,
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत आणि सक्रिय असलेल्या बांधकाम कामगारांना राज्य शासनाच्या कामगार विभागामार्फत गृहपयोगी वस्तूंच्या वितरणास मंजुरी मिळाल्यानंतर, पारनेर तालुक्यातील ११० बांधकाम कामगारांना गृहपयोगी साहित्य आणि सुरक्षा संचाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी पारनेरचे आमदार काशिनाथ दाते सर यांच्या हस्ते हे वाटप पार पडले.

या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) तालुकाध्यक्ष विक्रमसिंह कळमकर, राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्षा सुधामती कवाद, सौरभ आरे, राष्ट्रवादी महिला तालुका उपाध्यक्षा जयश्री शिंदे, अरुण राजदेव यांसह विविध पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने लाभार्थी महिला-पुरुष बांधकाम कामगार उपस्थित होते.

कार्यक्रमात आमदार काशिनाथ दाते यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “सर्वसामान्यांच्या हितासाठी आपण खंबीरपणे उभे आहोत आणि प्रत्येक कामात पारदर्शकता आवश्यक आहे.” त्यांनी पुढे म्हटले की, स्थलांतरित बांधकाम कामगारांना निवास, शिक्षण आणि आरोग्याच्या अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांच्या संसाराला हातभार लागावा म्हणून राज्य शासनाने ३० वस्तूंचा गृहपयोगी संच देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा लाभ अधिकाधिक कामगारांना मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.


राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुका उपाध्यक्षा जयश्री शिंदे यांनी या योजनेचा लाभ बांधकाम कामगारांना मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अनेक लाभार्थ्यांना हे साहित्य मिळाले.

या वाटपामुळे तालुक्यातील बांधकाम कामगार कुटुंबांना मोठा आधार मिळाला असून, शासनाच्या कल्याणकारी योजनांचा प्रत्यक्ष लाभ पोहोचवण्याचे काम आमदार काशिनाथ दाते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सातत्याने करत आहेत.
Exit mobile version