पारनेर / प्रतिनिधी,
टाकळी ढोकेश्वर येथे नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला टाकळी ढोकेश्वर येथील न्यू ओपोस्टॉलिक चर्चमध्ये चर्च पास्टर विनोद गायकवाड यांनी नाताळ सना निमित्त उपस्थित सर्वांना ख्रिस्तजन्माचा संदेश दिला यावेळी सर्व ख्रिस्ती बांधव याठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते २४ डिसेंबर रोजी रात्री बारा वाजता ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करून एकमेकांना शुभेच्छा देऊन ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला २५ डिसेंबरला सकाळी साडे दहा वाजता भक्ती घेऊन बायबल वाचन पठण करून पास्टर विनोद गायकवाड , पास्टर दादाभाऊ बागुल ,पास्टर अजय पंडित यांनी सर्वांना ख्रिस्तजन्माचा संदेश दिला. तसेच नाताळ व येणाऱ्या नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देखील या ठिकाणी देण्यात आल्या आहे यावेळी उपस्थित सर्व ख्रिस्ती बांधवांनी देखील नाताळ सणाच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या . नाताळ सणानिमित्त चर्चला सजावट करून आकर्षक रोषणाई देखील करण्यात आली होती चर्च सुटल्यानंतर दुपारी गावातील सर्व लोकांसाठी अल्पोपहार व फराळाचे नियोजन करण्यात आले होते . यावेळी एकनाथ साळवे, नितीन काशीकेदार , सुबोध गायकवाड ,प्रमोद गायकवाड, विलास चिकणे, ओम नाईकवाडी,आहेर परिवार,बेलकर परिवार, योहान गायकवाड , इंदुबाई घंगाळे, संदेश गायकवाड, कुणाल गायकवाड, विराज गायकवाड ,आदेश गायकवाड ,स्वराज गायकवाड, यांच्या सह ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम संपल्यानंतर पास्टर विनोद गायकवाड, पा.अजय पंडित, यांनी सर्वांचे आभार मानले.

