पेमदरा येथील ‘त्या’ कलाकेंद्राच्या बांधकामाला जुन्नरच्या तहसीलदारांचा तात्काळ स्थगितीचा आदेश

जुन्नर सह पारनेर तालुक्यातील ही ग्रामस्थांचा “त्या” कलाकेंद्राला होता तीव्र विरोध!

प्रशासनाला घ्यावा लागला काम बंदीचा निर्णय

पारनेर / प्रतिनिधी,
मौजे पेमदरा, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे येथील गट नंबर ३४० मधील ६,००० चौरस मीटर क्षेत्रावरील प्रस्तावित ‘Cultural Hall & Exhibition Cum Convention Center’ च्या बांधकामाला तात्काळ थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सहाय्यक संचालक, नगर रचना मूल्यनिधारण विभाग, पुणे यांनी दिनांक २४ डिसेंबर २०२४ रोजीच्या आदेशान्वये (जा.क्र. रेखांकन/एनएव्हीपी/मो. पेमदरा/ता. जुन्नर ग.नं. ३४०/संसपु/१३९७) या बांधकामाच्या नकाशांना मंजुरी दिली होती. त्यानंतर, दिनांक १० जानेवारी २०२५ रोजीच्या आदेशान्वये (जा.क्र./विशे/एसआर/०६/२०२४) या प्रकल्पाला परवानगी मिळाली होती.

मात्र, दिनांक ४ ऑगस्ट २०२५ रोजी शिवसेना तालुका प्रमुख (जुन्नर) श्री. योगेश (बाबूभाऊ पाटे) यांनी या कार्यालयास निवेदन सादर करून सदर कला केंद्राच्या बांधकामावर तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली. या निवेदनाच्या अनुषंगाने, प्रशासनाने बांधकाम तात्काळ थांबविण्याचे निर्देश दिले आहेत.

या आदेशामुळे पेमदरा येथील प्रस्तावित सांस्कृतिक सभागृह आणि प्रदर्शन केंद्राच्या बांधकामाला अनिश्चित काळासाठी स्थगिती मिळाली आहे. याबाबत पुढील कार्यवाहीसाठी प्रशासनाकडून अधिक माहिती अपेक्षित आहे.

या संदर्भात ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत असून, स्थानिक प्रशासनाकडून अधिक चौकशी आणि सुनावणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, प्रकल्पाचे समर्थक या विकासकामास न्याय देण्यासाठी पुढील कायदेशीर पर्यायांचा विचार करत आहेत.



🔶🔶🔶🔶🔶🔶
कला केंद्र बाबत पारनेर तालुक्यातील ग्रामस्थांची भूमिका
———————————
तसेच हे कलाकेंद्र बंद व्हावे यासाठी
पारनेर तालुक्यातील 17 गावांचे कला केंद्राच्या विरोधात ठरावं घेऊन निलेश लंके प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष रवींद्र राजदेव यांनी पारनेर तहसीलला निवेदन दिले होते.
पारनेरच्या तहसीलदार गायत्री सौंदणे यांनी अहिल्यानगर जिल्हाधिकारी तसेच पुणे जिल्हाधिकारी व जुन्नरचे तहसीलदार यांना या ठरावाच्या प्रती पाठवत कला केंद्र बंद करण्यासंदर्भात माहिती दिली.


पेमदरा येथील कला केंद्र बंद व्हावे यासाठी निलेश लंके प्रतिष्ठान ने आक्रमक भूमिका घेतली होती. परिसरातील सर्व ग्रामस्थांना एकत्र करून रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निलेश लंके प्रतिष्ठानचे पदाधिकारी रवींद्र राजदेव यांनी दिला होता. या कलाकेंद्राला शिवाजीशेठ बेलकर, सावरगाव येथील सरपंच नंदा शिंदे, माजी उपसरपंच प्रदीप गुगळे, बाळासाहेब शिरतार, रवींद्र गायखे, संतोष गायखे, बाबाजी लांडगे, उपसरपंच बाळासाहेब चिकणे, सरपंच प्रकाश गाजरे, सरपंच पियुष गाजरे, सरपंच संजय काशीद, सरपंच बापू ठुबे, सरपंच श्रीकांत डेरे, सरपंच संजय रोकडे, डॉ. नितीन रांधवन, सरपंच अशोक वाळुंज, माजी सरपंच सोमनाथ आहेर, सरपंच कैलास गागरे, सरपंच श्रमिनी चौधरी, आदींनी या कला केंद्राला कडाडून विरोध केला होता त्यामुळे या दबावा पुढे प्रशासनाला नमते भूमिका घेऊन कला केंद्र बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे हे यश निलेश लंके प्रतिष्ठानचे असून पारनेर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील गावांमधून सुद्धा मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.


🔶🔶🔶🔶🔶🔶
रस्ता रोको आंदोलन करणारच..

जुन्नरच्या हद्दीतील पेमदरा येथील कला केंद्र कायमस्वरूपी बंद व्हावे म्हणून पाठपुरावा करत असलेले निलेश लंके प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष रवींद्र राजदेव म्हणाले की कला केंद्र सुरू करण्याचे नाटक जर पुन्हा केले तर आम्ही रस्त्यावर उतरू असा आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.
Exit mobile version