पारनेर / प्रतिनिधी,
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष प्रमुख सन्माननीय श्री राज साहेब ठाकरे यांच्या वर विश्वास ठेवून मोठ्या संख्येने पारनेर तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश चालू आहे अहिल्या नगर जिल्हा संपर्क प्रमुख श्री नयन कदम साहेब यांच्या सुचनेनुसार जिल्हा अध्यक्ष श्री सचिन डफळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर तालुका अध्यक्ष श्री अविनाश पवार यांच्या हस्ते आज सुपा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना निघोज- अळकुटी गट तालुका उपाध्यक्ष पदी प्रवीण सुभाष कोठावळे यांची निवड करण्यात आली तर निघोज शाखा अध्यक्ष पदी अमोल शंकर ढवण यांची तसेच नारायणगव्हाण शाखा उपाध्यक्ष पदी सूरज सुखदेव गोरे यांची निवड करण्यात आली.
या वेळी मा.जिल्हा उपाध्यक्ष पप्पू लामखडे यांच्या मार्गदर्शनाखाली निघोज येथिल तरुणांनी मोठ्या संख्येने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला तालुका सचिव नारायण नरवडे तालुका उपाध्यक्ष विरेंद्र थोरात सुपा शहराध्यक्ष अक्षय सूर्यवंशी पारनेर शहराध्यक्ष सतीश म्हस्के यांच्या उपस्थितीत निघोज येथिल साई दादा ढवण ,संकेत ढवण रवी फुलारे शुभम ढवण, अक्षय मुळे, राम ढवण, अमोल दळवी, अभिजीत वाजे, अजिंक्य वाजे, प्रदीप कोठावळे, विशाल ढवण, विशाल ढवण, श्रीकांत ढवळ, विकास ढवण, संतोष ढवण, योगेश ढवण, ऋतिक ढवण, सोन्या सोनवणे ,अनिल थोरात, रघुनाथ मांडगे, सार्थक मांडगे ,प्रकाश बांदल यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला एवढ्या मोठ्या संख्येने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश होत असल्याने तालुका अध्यक्ष पवार यांनी समाधान व्यक्त केले शेत मालाचे पडलेले भाव आणि उत्पादन खर्च वाढला असल्यामुळे तसेच वाढती महागाई यामुळे लोकांचा सत्ताधारी सरकार वरचा विश्वास संपला असल्याने सन्माननीय श्री राज साहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने पारनेर तालुक्यात चुकीच्या गोष्टी विरोधात प्रखर विरोध करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आवाज उठवत आहे त्यामुळे पारनेर तालुक्यात विरोधी पक्ष म्हणून फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना काम करत असल्याने लोकांचा विश्वास वाढल्याने पक्षांमध्ये मोठ्या संख्येने प्रवेश होत असल्याचे पवार यांनी सांगितले.



