Thursday, November 26, 2026
Google search engine
Homeटाकळी ढोकेश्वरमोहनराव रोकडेंच्या वाढदिवसानिमित्त रविंद्रशेठ राजदेव यांचा टाकळी ढोकेश्वर गटात कौतुकास्पद उपक्रम

मोहनराव रोकडेंच्या वाढदिवसानिमित्त रविंद्रशेठ राजदेव यांचा टाकळी ढोकेश्वर गटात कौतुकास्पद उपक्रम


गाजदीपुर येथील नागरिकांना साखरेचे वाटप; तर लहान मुलांना खाऊचे केले वाटप 

पारनेर / प्रतिनिधी, 
जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते मोहनराव रोकडे यांचा वाढदिवस पारनेर शहर आणि ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. पारनेर येथील शासकीय विश्रामगृह आणि वडगाव सावताळ (गाजदिपूर) येथे आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यांतून पक्षाची मजबूत एकजूट आणि नेत्यांची सामाजिक बांधिलकी पाहायला मिळाली.

🔶🔶🔶🔶🔶🔶
शासकीय विश्रामगृहात मान्यवरांची मांदियाळी….
टाकळी ढोकेश्वर येथील शासकीय विश्रामगृहावर दीपक अण्णा लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत वाढदिवसाचा मुख्य कार्यक्रम पार पडला. यावेळी टाकळी ढोकेश्वर गटाचे नेते रविंद्रशेठ राजदेव, उपसरपंच किरण तराळ, शिक्षक नेते संतोष खामकर आणि दत्ता निवडूंगे आदी मान्यवर आवर्जून उपस्थित होते. याप्रसंगी मोहनराव रोकडे यांच्या पक्षातील भरीव योगदानाचा, सामाजिक कार्याचा आणि राजकीय वाटचालीचा विशेष सन्मान करण्यात आला. उपस्थितांनी त्यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरवले. सत्काराला उत्तर देताना रोकडे यांनी सर्वांचे आभार मानत पक्षसंघटन अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी हातात हात घालून काम करण्याचे आवाहन केले.

🔶🔶🔶🔶🔶🔶
रविंद्रशेठ राजदेव यांच्याकडून गाजदीपुर मध्ये अभिनव उपक्रम….
दुसरीकडे, टाकळी ढोकेश्वर गटाचे प्रमुख नेते रविंद्रशेठ राजदेव यांनी मोहनराव रोकडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रामीण भागात एक विशेष आणि आगळावेगळा उपक्रम राबवला. त्यांनी वडगाव सावताळ (गाजदिपूर) येथे ग्रामस्थांसोबत साखर आणि विविध खाऊचे वाटप करत वाढदिवसाचा आनंद द्विगुणित केला. ग्रामस्थांनी रविंद्रशेठ राजदेव यांच्या या पहिल्याच आणि स्तुत्य उपक्रमाचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. यावेळी राजदेव यांनी सर्व ग्रामस्थांना शुभेच्छा देत भविष्यातही असे जनहिताचे सामाजिक उपक्रम निरंतर सुरू ठेवण्याची ग्वाही दिली.

🔶🔶🔶🔶🔶
ग्रामीण विकासाचा आणि एकजुटीचा जागर….
वडगाव सावताळ येथील या कार्यक्रमास महिला भगिनींची उपस्थिती लक्षणीय होती. याशिवाय शिक्षक नेते संतोष खामकर, उत्तमशेठ नऱ्हे, खंडू करगळ, नांदूर पठारचे सरपंच भानुदास आग्रे, भाऊसाहेब चौधरी, पत्रकार विनोद गायकवाड, श्रीनिवास शिंदे, गणेश जगदाळे, भाऊसाहेब सातकर पाटील, खंडू कोळेकर आणि गुलाब करगळ यांसारख्या अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.

या दोन्ही कार्यक्रमांच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भक्कम एकजूट आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी नेत्यांचे प्रामाणिक प्रयत्न यावर सविस्तर चर्चा झाली. शेवटी, उपस्थित सर्वांनी मोहनराव रोकडे यांना निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments