Thursday, November 26, 2026
Google search engine
Homeपारनेरसावित्री, फातेमा सदभावना मंच पारनेर यांच्या वतीने शनिवारी 'सन्मान गुणवंत गुरुजनांचा' कार्यक्रमाचे...

सावित्री, फातेमा सदभावना मंच पारनेर यांच्या वतीने शनिवारी ‘सन्मान गुणवंत गुरुजनांचा’ कार्यक्रमाचे आयोजन

 


 माजी प्राचार्य डॉक्टर विद्याधर औटी (सर) आणि ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांना जीवनगौरव पुरस्कार

पारनेर / भगवान गायकवाड, 
शिक्षणाच्या पवित्र कार्यात आपले मोलाचे योगदान देणाऱ्या मान्यवरांना जीवन गौरव पुरस्कार आणि पारनेर तालुक्यातील गुणवंत प्राथमिक शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी सावित्री-फातेमा सदभावना मंच, पारनेर यांच्या वतीने एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

      ‘सन्मान गुणवंत गुरुजनांचा’ या नावाने होणारा हा सोहळा शनिवार, दि. २९ रोजी सकाळी १०.३० वाजता, आनंद लॉन्स, पारनेर येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिक्षण आणि अध्यात्म यांचा संगम पाहायला मिळणार आहे. या वेळी ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांचे ‘संत आणि शिक्षणाची महत्ता’ या विषयावर प्रबोधनपर प्रवचन होणार आहे. महाराजांचे मार्गदर्शन उपस्थित शिक्षक आणि नागरिकांना प्रेरणा देणारे ठरेल. सावित्री-फातेमा सदभावना मंचने समाजातील दोन महत्त्वपूर्ण व्यक्तींच्या कार्याचा गौरव करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय कीर्तनकार आणि समाजप्रबोधनकार ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे आणि पारनेरचे भूमिपुत्र, शिक्षण क्षेत्रात अमूल्य योगदान देणारे प्राचार्य डॉ. विद्याधर औटी (सर) यांना त्यांच्या जीवनकार्याबद्दल जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.प्राचार्य डॉ. विद्याधर औटी यांनी पारनेर तालुक्याचे नाव शिक्षण क्षेत्रात मोठे केले आहे, तर ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य अविरतपणे सुरू ठेवले आहे. त्यांच्या या सन्मानाने उपस्थित सर्वांना प्रेरणा मिळेल यात शंका नाही. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला प्रशासकीय व शिक्षण क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यांची उपस्थिती या सोहळ्याला विशेष उंची प्राप्त करून देईल. 

या महत्वपूर्ण कार्यक्रमासाठी संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालनालय, पुणे, महाराष्ट्र राज्य डॉ. महेश पालकर,मुख्यमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य, देवराम पळसकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद अहिल्यानगर, भास्कर पाटील यांच्यासह इतर अधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सावित्री-फातेमा सदभावना मंच, पारनेर यांनी तालुक्यातील आणि पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना या प्रेरणादायी सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे विनम्र आवाहन केले आहे.

शिक्षण क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान आणि थोर व्यक्तींचे मार्गदर्शन ऐकण्याची ही सुवर्णसंधी आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
🔶🔶🔶🔶🔶🔶
गुणवंत शिक्षक पुरस्कर्ते…. 
मल्हारी रेपाळे ( जि. प. शाळा पुणेवाडी), शगुफा शेख ( जि. प. शाळा, कण्हेर ओहळ), गोरक्ष पावडे ( जि. प. शाळा, पाबळ लोणी हवेली), वैशाली औटी ( जि.प शाळा पाडळी दर्या), सचिन ठाणगे,( जि.प शाळा धोत्रे बुद्रुक,), सतीश नरसाळे ( जि.प.शाळा ढवळपुरी), हिराबाई लटांबळे ( जि. प. शाळा अळकुटी),द्यानेश्वर जाधव (जि.प शाळा शिंदे मळा, वडगाव सावताळ), वृषाली गायकवाड ( जि.प.शाळा राळेगण सिद्धी), सतीश भालेकर ( जि.प.शाळा पिंपरी जलसेन) आदीचा समावेश आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments