सुनीताताई सोबले यांचा आमदार काशिनाथ दाते यांच्या हस्ते सन्मान; वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

पारनेरच्या आक्रमक महिला नेतृत्वाचा विविध मान्यवरांकडून गौरव

पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्याच्या समाजकारण आणि राजकारणात आक्रमक महिला नेतृत्व म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेल्या पारनेर शहरातील सोबलेवाडी येथील सामाजिक कार्यकर्त्या सुनीताताई सोबले यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने आमदार काशिनाथ दाते यांनी सुनीताताई सोबले यांचा सन्मान करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष वसंत चेडे, जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रशांत गायकवाड, पारनेर महाविद्यालयाचे प्राचार्य रंगनाथ आहेर, नगरसेवक अशोक चेडे, युवा नेते माऊली औटी आदी मान्यवर उपस्थित होते.

सुनीताताई सोबले यांनी सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रमांच्या माध्यमातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. महिलांचे प्रश्न, सामाजिक उपक्रम आणि सर्वसामान्यांच्या विविध प्रश्नांवर त्या सातत्याने आक्रमक भूमिका मांडत असतात. त्यांच्या कार्याची दखल घेत वाढदिवसानिमित्त विविध स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील व पारनेर शहराचे माजी नगराध्यक्ष विजय औटी, नगरसेवक युवराज पठारे तसेच पारनेर तालुका पत्रकार मित्रपरिवार यांच्या वतीनेही सुनीताताई सोबले यांना शुभेच्छा देण्यात आल्या. वाढदिवसानिमित्त झालेल्या या सन्मानामुळे सुनीताताई सोबले यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Exit mobile version