Friday, November 27, 2026
Google search engine
Homeपारनेरअंधाराकडून प्रकाशाकडे; देवीभोयरे येथील 'लालखण-भिल्लवस्ती'त प्रथमच उजळला विकासाचा प्रकाश

अंधाराकडून प्रकाशाकडे; देवीभोयरे येथील ‘लालखण-भिल्लवस्ती’त प्रथमच उजळला विकासाचा प्रकाश


देवीभोयरे येथील लालखण–भिल्लवस्ती येथे ३ लक्ष रुपयांच्या ‘सोलर हायमॅक्स’चे लोकार्पण…


दिलेला शब्द पाळला… विकासाचा प्रकाश पोहचवला

     अहमदनगर जिल्ह्याचे कार्यक्षम पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री मा. ना. श्री. राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्या खंबीर नेतृत्वाखाली आणि भाजप राज्य परिषद सदस्य मा. श्री. विश्वनाथ दादा कोरडे यांच्या अथक पाठपुराव्यातून देवीभोयरे येथील लालखण–भिल्लवस्ती येथे जिल्हा नियोजन विभागातून मंजूर झालेल्या ३ लक्ष रुपयांच्या ‘सोलर हायमॅक्स’चे लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर मिळाला न्याय!…
देवीभोयरे येथील लालखण-भिल्लवस्ती हा भाग गेल्या अनेक दशकांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित होता. अत्यंत खेदाची बाब म्हणजे, आजवर या वस्तीकडे एकाही लोकप्रतिनिधीने गांभीर्याने लक्ष दिले नव्हते. येथील नागरिक स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही अंधारातच आपले जीवन कंठत होते. रात्रीच्या वेळी होणारा त्रास आणि सुरक्षिततेचा प्रश्न यामुळे येथील बांधव त्रस्त होते.

विश्वनाथ दादांचा शब्द आणि विखे पाटील साहेबांची साथ!…
या भागातील परिस्थितीची दाहकता ओळखून मा. विश्वनाथ दादा कोरडे यांनी नामदार विखे पाटील साहेबांकडे या कामाचा पाठपुरावा केला. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ३ लक्ष रुपयांचा निधी तातडीने मंजूर करून घेऊन, या वस्तीत हायमॅक्स बसवण्याचे काम पूर्ण करण्यात आले.

 काल या सोलर हायमॅक्सचे उद्घाटन मा. विश्वनाथ दादा कोरडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. वस्तीतील नागरिकांनी यावेळी अत्यंत भावूक होत दादांचे आणि नामदार विखे पाटील साहेबांचे आभार मानले. *”आमच्या आयुष्यात आज खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होत आहे,”* अशा भावना ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केल्या. तसेच यावेळी बोलताना मा.श्री.विश्वनाथ दादा कोरडे म्हणाले की, *”वंचितांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने प्रकाश पोहोचेल अशा विकासकामांतून खऱ्या अर्थाने मानसिक समाधान मिळते.”

यावेळी मा. उपसरपंच विकास शेठ सावंत, सामाजिक कार्यकर्ते बाबुराव मुळे, आदर्श शिक्षक विश्वनाथ गाजरे गुरुजी, विजय बेलोटे, विश्वनाथ बेलोटे,अमोल गजरे, कमलाकर बेलोटे मेजर, गणेश बेलोटे, बापूशेठ कोल्हे, विकास धुळे, पोपट माळी, रवींद्र जाधव, भाऊसाहेब बेलोटे, हर्षद झावरे, सागर सरडे, दीपक मगर, अनिकेत मंडले, सचिन बेलोटे व ढगावस्ती मधील (लालखन) सर्व समुदाय उपस्थित गावातील प्रतिष्ठित नागरिक, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments