Thursday, November 26, 2026
Google search engine
Homeअहिल्यानगरपहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा मुस्लिम समाजाच्या वतीने जाहीर निषेध - रमीज...

पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा मुस्लिम समाजाच्या वतीने जाहीर निषेध – रमीज भैय्या राजे


पारनेर / प्रतिनिधी,
ऑपरेशन सिंदूर करून भारताने पहलगाम हल्ल्याचा बदल घेतला. भारतीय सैन्याचं एअर स्ट्राइक ऑपरेशन सिंदूर सक्सेसफुल. पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीर मधील दहशतवाद्यांचे 9 ठिकाने उध्वस्त. भारतीय सैन्याने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. पाकिस्तासह पाकव्याप्त काश्मीरमधील मुजफ्फराबादसह 9 दहशतवादी ठिकाणांवर भारतीय सैन्यानं स्ट्राईक करत हे स्थळ उध्वस्त केले आहेत. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीयांसह जगभरात संतापाची लाट पसरली होती. पाकिस्तानने केलेल्या या भ्याड हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. दरम्यान हा हल्ला होऊन दोन आठवडे उलटून गेल्यानंतर ही कुठलीही कठोर कारवाई होत नसल्याने भरतीयांमध्ये अस्वस्थता ही दिवसागणिक वाढत होती. तर दुसरीकडे सीमेवर तनाव देखील अधिक तीव्र होत होता. अशातच तमाम भारतीयांची मानत घर करून राहिलेली चीड आणि या भ्याड हल्ल्याचा बदला भारतीय सैन्यदल घेत आहे पाकिस्तान मधील दहशतवाद्यांचे ठिकाणे उध्वस्त करत आहेत तसेच पाकिस्तानला देखील धडा शिकवण्यासाठी आज भारत पाकिस्तानवर ज्या कारवाया करत आहे संपूर्ण देशासाठी अभिमानाचा विषय आहे.

पारनेर तालुक्यातील तमाम मुस्लिम बांधवांच्या वतीने या कारवाईचे स्वागत करण्यात आले. पाकिस्तानला धडा शिकवण्याची हीच वेळ होती असे रमीज सलीम राजे यांनी पारनेर तालुक्यातील तमाम मुस्लिम बांधवांच्या वतीने सांगितले आहे. अशा भारत मातेच्या वीर जवानांसाठी जे आपल्या अस्मितेसाठी पाकिस्तानशी लढत आहेत तसेच आपले बलिदान देखील देत आहेत अशा सैनिकांसाठी काही दिवसांमध्ये पारनेर शहरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे रमीज राजे यांनी सांगितले.



रमिज राजे यांनी या उपक्रमाबाबत बोलताना सांगितले, “देश संकटात असताना प्रत्येक नागरिकाने आपल्या परिने योगदान देणे गरजेचे आहे. रक्तदान हे जीवनदान आहे आणि युद्धजन्य परिस्थितीत रक्ताची गरज वाढू शकते. म्हणूनच आम्ही हा उपक्रम आयोजित करत आहोत.” त्यांनी नागरिकांना, विशेषतः युवकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. शिबिराची माहिती गावागावांत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्यात येत आहे.
पारनेरमधील या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून सामाजिक एकता आणि देशभक्तीचा संदेश देण्याचा प्रयत्न आहे. रमिज राजे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम यशस्वी होईल, असा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे. भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन सुरू राहील, असे राजे यांनी जाहीर केले.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments