Thursday, November 26, 2026
Google search engine
Homeटाकळी ढोकेश्वरकाटाळवेढा व डोंगरवाडीत २२५ महिला व ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी (NCMC) कार्डचे वाटप

काटाळवेढा व डोंगरवाडीत २२५ महिला व ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी (NCMC) कार्डचे वाटप

टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटाचे नेते रवींद्रशेठ राजदेव यांच्या हस्ते कार्डचे वितरण 


काटाळवेढा (विशेष प्रतिनिधी),
काटाळवेढा आणि डोंगरवाडी गावातील ग्रामस्थांची गैरसोय टाळण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष शिबिरातील २२५ महिला व ज्येष्ठ नागरिकांना एसटी महामंडळाच्या सवलतीच्या एनसीएमसी (NCMC) कार्डचे यशस्वीरित्या वाटप करण्यात आले. निलेश लंके प्रतिष्टानचे उपतालुकाप्रमुख पोपटशेठ गुंड यांच्या माध्यमातून काटाळवेढा आणि डोंगरवाडी गावातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी महामंडळाच्या सवलतीच्या एनसीएमसी (NCMC) कार्डच्या विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटाचे नेते रवींद्रशेठ राजदेव यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत एनसीएमसी (NCMC) कार्डचे वाटप करण्यात आले. 

🔶🔶🔶🔶🔶
गावातील कोणत्याही व्यक्तीला, विशेषतः महिला आणि वयोवृद्धांना कार्ड काढण्यासाठी बाहेरगावी जावे लागू नये, त्यांचा वेळ, पैसा वाचून शारीरिक व मानसिक त्रास टळावा, या प्रामाणिक हेतूने १७ मे रोजी गावातच या कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. ‘आपली कामे गावातच व जागेवर व्हावीत’ या संकल्पनेला ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिला. या कॅम्पमध्ये तब्बल २२५ महिला व ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आपले अर्ज दाखल केले होते.
या सर्व लाभार्थ्यांचे कार्ड तयार होऊन आल्यानंतर, तातडीने वाटपाची कार्यवाही सुरू करण्यात आली. रवींद्रशेठ राजदेव यांच्या उपस्थितीत सर्व लाभार्थ्यांचे कार्ड ऑनलाइन करून देण्याची प्रक्रिया राबवण्यात आली. 

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
“महिला व ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या हक्काच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच विविध योजनांसाठी तालुक्याच्या ठिकाणी चकरा माराव्या लागू नयेत आणि त्यांची धावपळ थांबवण्यासाठी गावातच राबवण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. लोकांची गैरसोय टळावी आणि त्यांना त्वरित लाभ मिळावा, यासाठी वेळेचे बंधन न पाळता सर्वांना कार्डचे वाटप केले. सर्वसामान्यांची कामे त्यांच्या गावातच व्हावीत, या भूमिकेतून आम्ही नेहमीच लोकांच्या पाठीशी उभे राहू. पोपटशेठ गुंड यांचे हे प्रामाणिक प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहेत.”
– रवींद्रशेठ राजदेव
नेते राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.)/ जि.प. टाकळी ढोकेश्वर गट.

🔶🔶🔶🔶🔶
शासकीय योजना तळागळापर्यंत पोहोचवणार – पोपटशेठ गुंड…
या यशस्वी उपक्रमाबद्दल बोलताना निलेश लंके प्रतिष्ठान (पारनेर) चे उपतालुकाप्रमुख तथा युवा सहकारी पोपटशेठ गुंड यांनी सांगितले की, “येथून पुढच्या काळातही टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटाचे नेते रविंद्रशेठ राजदेव आणि सोनियाताई राजदेव यांच्या नेतृत्वाखाली शासनाच्या विविध वैयक्तिक लाभाच्या योजना सर्वसामान्य, गरजू व गरीब लोकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी माझ्याकडून अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली जाईल.”
या उपक्रमामुळे काटाळवेढा व डोंगरवाडी परिसरातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, गावातच मिळालेल्या या सुविधेबद्दल आयोजकांचे आभार मानले आहेत.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments