Wednesday, November 25, 2026
Google search engine
Homeपारनेरगोरेगावच्या प्रियांका नरसाळे यांना भौतिकशास्त्र विषयात पी.एच.डी

गोरेगावच्या प्रियांका नरसाळे यांना भौतिकशास्त्र विषयात पी.एच.डी



पारनेर : ता. पारनेर, 

 पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथील सौ. प्रियांका युवराज सुंबे / नरसाळे यांनी भौतिकशास्त्र (Physics) विषयात पी.एच.डी. पदवी संपादन करून आपल्या गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. प्रियंका या इंजिनिअर युवराज बापुसाहेब नरसाळे यांच्या धर्मपत्नी आहेत

प्रियंका यांनी २८ ऑक्टोबर २०२६ रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पी.एच.डी. यशस्वीरीत्या पूर्ण केली. प्रियांका यांचे इयत्ता बारावीचे शिक्षण न्यू इंग्लिश ज्युनिअर कॉलेज पारनेर तर बी.एस्सी.पर्यंतचे शिक्षण न्युज आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पारनेर येथे पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून एम.एस्सी. आणि एम.फिल. या पदव्या प्राप्त केल्या. पुढे भौतिकशास्त्र विषयात संशोधन करून प्रियंकाने पीएच.डी.पर्यंतचा शैक्षणिक प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला.

जिद्द, चिकाटी, मेहनत आणि संशोधनाची आवड यांच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे गोरेगावसह संपूर्ण पारनेर तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
 गोरेगाव येथील सौ. प्रियांका नरसाळे यांनी भौतिकशास्त्र विषयात पी.एच.डी. पदवी संपादन करून उल्लेखनीय यश मिळवले, ही संपूर्ण पारनेर तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे. पी.एच.डी.सारखी कठीण आणि प्रदीर्घ संशोधनाची कसोटी पाहणारी पदवी त्यांनी जिद्द, चिकाटी व अथक परिश्रमांच्या जोरावर प्राप्त केली आहे. त्यांच्या या यशामुळे गोरेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी त्या निश्चितच प्रेरणादायी ठरतील. त्यांच्या या घवघवीत यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व पुढील शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

– आमदार काशिनाथ दाते सर
(विधानसभा सदस्य)
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments