Friday, November 27, 2026
Google search engine
Homeपारनेर“आ. दातेंच्या नेतृत्वावर विश्वास; अळकुटीतील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश”

“आ. दातेंच्या नेतृत्वावर विश्वास; अळकुटीतील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश”


पारनेर / ता. प्रतिनिधी,  

सोमवार दि. २० एप्रिल २०२६ पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात आमदार काशिनाथ दाते सर यांच्या विकासाभिमुख कार्यशैलीवर आणि सर्वसामान्यांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्यावर विश्वास ठेवत कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे ओढा सातत्याने वाढत असल्याचे चित्र अळकुटी येथे पुन्हा एकदा नव्याने पाहायला मिळाले. अळकुटी येथील परंडवाल मळ्यातील कार्यकर्त्यांनी आज आमदार दाते सर यांच्या प्रमुख उपस्थितीत पारनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव चेडे प्रमुख उपस्थिती होते, पारनेर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा रेश्मा गलांडे व मच्छिंद्र गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश काशिनाथ परंडवाल, सचिन कोडीभाऊ परंडवाल, तुकाराम सिताराम परंडवाल, जयराम शिवराम परंडवाल, प्रविण काशिनाथ परंडवाल, सुयश सुरेश परंडवाल यांनी पक्षाचा झेंडा हाती घेतला. या सर्वांनी आमदार दाते सरांच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत विकासाच्या वाटचालीत सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी आमदार काशिनाथ दाते सर म्हणाले “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तळागाळातील कार्यकर्त्यांचा पक्ष असून, येथे प्रत्येकाला काम करण्याची आणि पुढे जाण्याची समान संधी आहे. मतदारसंघातील सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासकामे राबविणे हीच आमची खरी ओळख आहे.”

“पक्षात नव्याने येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान राखत त्यांच्या माध्यमातून गावागावात विकासाची गती वाढवण्याचा आमचा प्रयत्न राहील. अळकुटी परिसरातही विकासकामांना आणखी वेग देत नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.” 

या प्रवेशामुळे अळकुटी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद अधिक बळकट झाली असून, स्थानिक पातळीवर संघटनात्मक बांधणीस नवी ऊर्जा मिळणार आहे.

🔶🔶🔶🔶🔶🔶
 आ. दाते सर सर्वसामान्यांना न्याय देणारे नेतृत्व आहे, प्रामाणिक नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षप्रवेश केला आहे. विकास, पारदर्शकता असल्याने आ. दाते यांच्या नेतृत्वाखाली पुढे वाटचाल करणार असुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बळकट करण्यासाठी काम करणार.
– सुरेश परंडवाल, सामाजिक कार्यकर्ते
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments