Wednesday, November 25, 2026
Google search engine
Homeपारनेरधर्मरक्षण, स्रीसन्मान आणि जनतेचे राज्य हाच शिवधर्म : मंगेश दाते

धर्मरक्षण, स्रीसन्मान आणि जनतेचे राज्य हाच शिवधर्म : मंगेश दाते



पारनेर : ता. प्रतिनिधी 

शुक्रवार दि. २० फेब्रुवारी २०२६ शिरापुर, चासकरवाडी येथे शिवमुद्रा प्रतिष्ठान आयोजित शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला यावेळी उद्योजक मंगेश दाते बोलत होते आमदार काशिनाथ दाते सर यांच्या स्थानिक विकास निधीतून स्मशानभूमी सुशोभीकरण करण्याकरिता दहा लक्ष रुपये व नामदार विखे साहेबांनी दिलेल्या हायमास्टचे लोकार्पण करण्यात आले. चासकरवाडी सारख्या छोट्या वाडीत शिवरायांचे विचार पेरले जातात ही अतिशय आनंदाची बाब आहे शिवरायांचे विचार नवीन पिढी आत्मसात करते ही समाजासाठी प्रेरणादायी बाब आहे समाजात काम करताना शिवरायांचे विचार घेऊन काम केले पाहिजे, विकास कामांची चिंता करू नका आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीमागे उभे रहा विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही.



आज आपण सर्व जण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, पराक्रमाचे प्रतीक, स्त्रीसन्मानाचे रक्षक आणि दूरदृष्टीचे महानायक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त एकत्र आलो आहोत. शिवरायांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ला येथे झाला. त्यांच्या मातोश्री जिजाबाई यांनी त्यांच्यावर संस्कारांची अमूल्य शिदोरी दिली, तर शहाजी राजे भोसले यांच्याकडून त्यांना शौर्याची परंपरा लाभली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. किल्ल्यांची बांधणी, आरमाराची उभारणी, शिस्तबद्ध प्रशासन आणि सर्वधर्मसमभाव या तत्त्वांवर त्यांनी राज्यकारभार केला. शत्रूशी लढताना त्यांनी गनिमी काव्याची नीती अवलंबली आणि मोठ्या साम्राज्यांनाही पराभूत केले.


यावेळी आर.एस.कापसे सर,
 सचिन पाटील वराळ, दिनेश बाबर, भास्कर उचाळे, विठ्ठलराव कवाद, शिवराज कदम, भिवा चासकर, बबन गुंड सर, सागर नरसाळे, भानुदास खुळे, सुभाष चासकर, 
साहेबराव चासकर, पोपट खुळे, अनिकेत चासकर, बाळकृष्ण चासकर, ओंकार चासकर, आकाश पिंगट, मोहन चासकर, अक्षय चासकर, प्रवीण वाळुंज, सचिन चासकर, रवी पिंगट, अनिल चासकर, आकाश पिंगट, कार्तिक चासकर, शिवाजी खुळे, बाळू मुंजाळ, महादू चासकर, संपत भाईक, पोपट चासकर, शुभम नरसाळे, बाबजी भाईक,चैतन्य चासकर, रमेश चासकर इ. मान्यवर उपस्थित होते.

🔶🔶🔶🔶🔶🔶
शिवरायांनी स्त्रियांचा सन्मान राखला, शत्रूच्या स्त्रियांनाही आई-बहिणी प्रमाणे वागणूक दिली. त्यांनी न्याय, नीती आणि प्रजेला केंद्रस्थानी ठेवून राज्य केले. म्हणूनच आजही त्यांचे विचार आणि आदर्श आपल्याला प्रेरणा देतात. आजच्या दिवशी आपण सर्वांनी त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याची प्रतिज्ञा करूया. आपल्या जीवनात प्रामाणिकपणा, धैर्य, स्वाभिमान आणि राष्ट्रप्रेम जोपासूया.

– मंगेश दाते, उद्योजक पारनेर
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

janshahi.com