Friday, November 27, 2026
Google search engine
Homeपारनेर“महिला डॉ. गौरी चौरे आत्महत्या प्रकरणी गोरगाव ग्रामस्थ आक्रमक; तीन दिवसांत आरोपींना...

“महिला डॉ. गौरी चौरे आत्महत्या प्रकरणी गोरगाव ग्रामस्थ आक्रमक; तीन दिवसांत आरोपींना अटक करण्याचे डि.वाय. एस.पी. वमणेंचे आश्वासन”


पारनेर / ता. प्रतिनिधी,  
गोरगाव येथील महिला डॉ. गौरी सुनील चौरे आत्महत्या प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याने संतप्त नागरिकांनी आज पारनेर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन छेडले. दहा दिवस उलटूनही पोलीस प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत नागरिक, नातेवाईक व विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात जमा होते. “आरोपींना तात्काळ अटक करा” तसेच “पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. 

महिला डॉ. गौरी चौरे हुंड्यासाठी व मानसिक छळ केल्याप्रकरणी पती, सासू व सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी आरोपी अद्याप फरार असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली होती. आंदोलनामुळे पोलीस ठाणे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.

यावेळी ग्रामस्थांच्या वतीने पोलिस प्रशासनाला दोन स्वतंत्र निवेदने देण्यात आली. पहिल्या निवेदनात संबंधित महिला डॉ. गौरी चौरे गोरेगांव येथे आत्महत्या केल्याचा उल्लेख करत तिच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या पती, सासू व सासऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली. आरोपी खुलेआम फिरत असून त्यामुळे पुरावे नष्ट होण्याची तसेच पीडित कुटुंबीयांवर दबाव येण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. आरोपींना त्वरित अटक करून कठोर शिक्षा करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.

नागरिकांनी पोलीस प्रशासनाच्या विलंबित कारवाईबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. “महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये तत्काळ कारवाई होणे आवश्यक आहे. मात्र या प्रकरणात दहा दिवस उलटूनही आरोपींना अटक न झाल्याने जनतेचा पोलिसांवरील विश्वास डळमळीत होत आहे,”तसेच या प्रकरणाचा वेगाने तपास करून पीडितेला न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

🔶🔶🔶🔶🔶🔶
🔸 आंदोलनाची माहिती मिळताच पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांनी तातडीने डि.वाय.एस.पी. शिरीष वमणे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून परिस्थितीची गंभीरता निदर्शनास आणून दिली. डी.वाय एस.पी. वमणे हे तातडीने पारनेर पोलीस ठाण्यात दाखल झाले व त्यांनी उपस्थित ग्रामस्थांशी चर्चा करून येत्या तीन दिवसांत संबंधित आरोपींना अटक करण्याचे स्पष्ट आश्वासन दिले.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments