पारनेर दि.७ पारनेर प्रतिनिधी, 
 जीवनाच्या रंगमंचावर सर्वात शेवटचा क्षण म्हणजे मृत्यू.. या शेवटच्या क्षणी अंत्यसंस्कार करण्यासाठी असलेली सामुदायिक स्मशानभूमी! या स्मशानभूमीत मृतकाचे दहन व दशक्रिया पार पाडल्या जातात. परंतु पावसाच्या दिवसात मृतकाचे अंत्यसंस्कार करते वेळी पत्राचे शेड नसल्याने पावसाळ्यात ग्रामस्थाना अडचणी निर्माण होत होत्या या अडचणीं वर मात करण्यासाठी पानोली गावचे सरपंच ,उपसरपंच, सदस्य आणि जागरूक नागरिक, ग्रामस्थ यांच्या प्रयत्नाने लोकसहभागातून स्मशानभुमीचे रूपडे बदलण्याचा निर्णय घेतला आणि या लोकसहभागाला ग्रामस्थानी प्रतिसाद देत स्मशानभूमी अद्यावत करण्यासाठी एकत्र आले. गावातील आप्तेष्टांच्या स्मरणार्थ देणगी स्वरूपात पत्रे , लोखंड, सिमेंट, विटा फरशी लोकसहभागातून उपलब्ध करण्यात आल्या.तसेच अंत्यसंस्कार वेळी आलेल्या नातेवाईकांना बसण्यासाठी सुरक्षित ओटे तयार करण्यात आले आहे. अंत्यसंस्कार वेळी आलेल्या नातवाईकांना पावसाळ्यात सुरक्षित ठिकाणी बसण्यासाठी असलेल्या पत्र्याच्या शेडचे व सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. स्मशानभूमी अद्ययावत होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed