Wednesday, November 25, 2026
Google search engine
Homeपारनेरसिद्धार्थ वसतिगृहातील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप संपन्न

सिद्धार्थ वसतिगृहातील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप संपन्न


पारनेर / भगवान गायकवाड, 

बहुजन शिक्षण संस्थेच्या सिद्धार्थ वसतिगृहातील गरजू विद्यार्थ्यांना आरपीआय (आंबेडकर गट) राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय उपयोगी वह्यांचे उत्साहात वाटप करण्यात आले. शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमा प्रसंगी युनिटी ऑफ मूलनिवासी समाज संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्र करंदीकर, सिद्धार्थ वसतिगृहाचे अधीक्षक संपत पवार, माजी सरपंच राजेंद्र साळवे, आरपीआय (आंबेडकर गट) तालुकाध्यक्ष किरण सोनवणे, ॲड. मोनिका सोनवणे आणि मोरे उपस्थित होते. तसेच युवा अध्यक्ष अजय साळवे, निखिल गायकवाड, प्रदीप कसबे, अक्षय जाधव, मच्छिंद्र साळवे, संतोष साळवे, प्रताप साळवे, विशाल साळवे, यश साळवे, अभिजीत घाडगे, राजु उघडे,मानव खुपटे आदी मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमामुळे वसतिगृहातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असलेले साहित्य मिळाल्यामुळे आनंद व्यक्त करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगून यशस्वी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानण्यात आले.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

janshahi.com