Wednesday, November 25, 2026
Google search engine
Homeपारनेरउद्योजकतेला चालना देणारा ‘प्रमाणपत्र वाटप व चर्चासत्र’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; खासदार नीलेश...

उद्योजकतेला चालना देणारा ‘प्रमाणपत्र वाटप व चर्चासत्र’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; खासदार नीलेश लंके यांची उपस्थिती



पारनेर / प्रतिनिधी, 

          सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) क्षेत्रातील उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला “प्रमाणपत्र वाटप व चर्चासत्र” कार्यक्रम खासदार नीलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.

           कार्यक्रमास मंत्र्यांचे सल्लागार (MSME मंत्रालय, भारत सरकार) संदीप पोखरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी उद्योजकांना मार्गदर्शन करताना उद्योग क्षेत्रातील नव्या संधी, केंद्र शासनाच्या विविध योजना, तसेच डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापराचे महत्त्व यावर सविस्तर माहिती दिली.


           यावेळी मार्गदर्शक म्हणून प्रफुल्ल राहाणे (पी.टी.ए., MSME मंत्रालय, खादी व ग्राम उद्योग आयोग), दिपक शिवदास (प्रबंधक, जिल्हा उद्योग केंद्र, अहिल्यानगर) तसेच खलील हवालदार (जिल्हा उद्योग केंद्र, नगर) यांनी उद्योजकांना उद्योग उभारणी, वित्तीय नियोजन, कर्जसुविधा, अनुदान योजना आणि व्यवसायवृद्धीबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.

          कार्यक्रमात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उद्योजकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यामुळे उद्योजकांच्या आत्मविश्वासात भर पडली असून नवउद्योजकांना उद्योग क्षेत्रात पाऊल टाकण्यासाठी प्रेरणा मिळाली.


           या उपक्रमामुळे MSME क्षेत्राच्या विकासाला चालना मिळणार असून स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मितीला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील उद्योजकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व मान्यवर, मार्गदर्शक, सहभागी उद्योजक व आयोजकांचे आभार मानण्यात आले.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments