Friday, November 27, 2026
Google search engine
Homeमुंबईराजस्थानच्या भरतपुर मधील सनातन स्कूलने रंगोत्सव स्पर्धेत मिळविले यश; तेलुगू चित्रपट अभिनेते...

राजस्थानच्या भरतपुर मधील सनातन स्कूलने रंगोत्सव स्पर्धेत मिळविले यश; तेलुगू चित्रपट अभिनेते पोसानी कृष्णा मुरली यांच्या हस्ते बक्षीस वितरण


पारनेर/प्रतिनिधी : 
सनातन स्कूल, भरतपूरने रंगोत्सव सेलिब्रेशन राष्ट्रीय कला स्पर्धेत मिळवले अप्रतिम यश…. 
मुंबईतील रंगोत्सव सेलिब्रेशन या संस्थेच्या वतीने आयोजित राष्ट्रीय स्तरावरील कला स्पर्धेत राजस्थानमधील भरतपूर येथील सनातन स्कूलने अप्रतिम कामगिरी केली आहे. ही संस्था २०१२ पासून देशभरातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी रंग कला, रेखाचित्र, अशा विविध प्रकारांच्या स्पर्धा आयोजित करते आणि आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही विस्तार करत आहे.

या स्पर्धेत सनातन स्कूलमधील ३०६ विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. 

 प्रथम क्रमांक तनिष गोयल, द्वितीय क्रमांक मनिका, तृतीय क्रमांक मोक्षिका सिंग आणि चतुर्थ क्रमांक हर्ष गौतम यांनी पटकावला.

बक्षीस वितरण समारंभ अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध तेलुगू चित्रपट अभिनेते, पटकथा लेखक आणि दिग्दर्शक पोसानी कृष्णा मुरली उपस्थित होते. त्यांनी विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे प्रदान करून प्रोत्साहन दिले. तसेच प्रमुख मान्यवर डॉ. एस. सी. शर्मा यांनीही कार्यक्रमाला शोभावर्धन केले आणि विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

सनातन स्कूल गेल्या दोन वर्षांपासून या स्पर्धेत सातत्याने सहभागी होत आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे रंगोत्सव सेलिब्रेशन संस्थेचे संचालक संग्राम दाते यांनी अभिनंदन केले आहे. यंदाच्या या यशस्वी कामगिरीने संपूर्ण शाळा परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्याध्यापक आणि शिक्षकवृंदाने विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमाचे कौतुक करत पुढील वर्षीही अशीच यशस्वी कामगिरी अपेक्षित असल्याचे सांगितले.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments