Wednesday, November 25, 2026
Google search engine
Homeपारनेरमहाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, पारनेर नगरपंचायत व सामाजिक वनीकरण यांच्या संयुक्त विद्यमाने...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, पारनेर नगरपंचायत व सामाजिक वनीकरण यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिननिमित्त पारनेर मध्ये वृक्षारोपण



पारनेर/प्रतिनिधी, 

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, पारनेर नगरपंचायत व सामाजिक वनीकरण यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वसुंधरा जतन आणि संवर्धन करण्यासाठी सामुदायिक प्रतिज्ञा घेण्यात आली. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प तराळवाडी येथे ५० विविध फळांची व भारतीय प्रजातींच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नगरपंचायत मुख्याधिकारी विनय शिपाई, नगराध्यक्ष नितीन अडसूळ, पाणी पुरवठा सभापती योगेश मते, डिजिटल मिडियाचे जिल्हाध्यक्ष विनोद गायकवाड, राज्य पत्रकार संघाचे उपाध्यक्ष श्रीनिवास शिंदे, सचिव लतिफ राजे( सर,) महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे शहराध्यक्ष भगवानराव गायकवाड, युवा नेते अर्जुनशेठ भालेकर, उद्योजक राजू शेख,नगरसेवक भूषण शेलार, अशोक चेडे, अंतर्गत लेखापाल आम्रपाली जाधव, कल्पना शिंदे, राजश्री घोडके, शंकर गोरे,सचिन औटी, सामाजिक वनीकरण विभागाचे वनरक्षक लखन भास्करराव शिंदे, वनरक्षक प्रशांत सिताराम फुलोरे, वनरक्षक रिंकू शंकर विरोळे, वनरक्षक गिरी, बाळासाहेब शेटे, अनिकेत देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. 

      यावेळी बोलताना नगराध्यक्ष नितीन अडसूळ म्हणाले की, वृक्षारोपण व संवर्धन काळाची गरज आहे. कारण भूतकाळातील झालेल्या पर्यावरणीय चुकांमुळे विविध पर्यावरणीय संकटांना तोंड देण्याची वेळ मानवावर आलेली आहे. यावेळी सृष्टीमित्र लतिफ राजे यांनी उपस्थितांना माझी वसुंधरा हि शपथ दिली.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments