आ. काशिनाथ दाते यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा संपन्न

 पारनेर / प्रतिनिधी, 

 पारनेर तहसील कार्यालयात ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा झाला. पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते यांच्या प्रमुख उपस्थितीत हा ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला.

सकाळी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात आमदार काशिनाथ दाते यांनी राष्ट्रध्वज फडकावून मानवंदना दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वसंतराव चेडे, तहसीलदार गायत्री सौंदाणे, निवासी नायब तहसीलदार दीपक कारखिले, महसूल नायब तहसीलदार डॉ. आकाश किसवे, निवडणूक नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे यांच्यासह मंडलाधिकारी, महसूल कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

तहसीलदार गायत्री सौंदाणे यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व विशद करत, देशाच्या प्रगतीसाठी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले. उपस्थित मान्यवरांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करत देशप्रेमाचा संदेश दिला. महसूल विभाग आणि पोलीस दलाने संचलनाद्वारे मानवंदना दिली, तर सामूहिक राष्ट्रगीताने उपस्थितांमध्ये देशभक्तीचा उत्साह निर्माण झाला.

या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. स्वातंत्र्य दिनाच्या या कार्यक्रमाने उपस्थितांमध्ये देशप्रेम, ऐक्य आणि स्वातंत्र्याच्या मूल्यांचे स्मरण पुन्हा जागवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed