Wednesday, November 25, 2026
Google search engine
Homeपारनेरपरमपित्याच्या सान्निध्यात ईश्वरीय शक्ती व दिव्य गुण धारण करणे म्हणजे खरी होळी...

परमपित्याच्या सान्निध्यात ईश्वरीय शक्ती व दिव्य गुण धारण करणे म्हणजे खरी होळी – साधना दिदी



पारनेरमध्ये आध्यात्मिक होळी उत्साहात साजरी

पारनेर / भगवान गायकवाड, 

      होळी म्हणजे घडून गेलेल्या जुन्या गोष्टी ज्या खूप काळ मनात ठेवलेल्या आहेत.त्या काढून टाकणे तसेच परमपित्याच्या सान्निध्यात ईश्वरीय शक्ती व दिव्य गुण धारण करणे म्हणजेच खरी होळी होय असे प्रतिपादन प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या पारनेर केंद्र संचालिका साधना दिदी यांनी केले. 

      पारनेर शहरातील ब्रह्मकुमारी केंद्रात ‘आध्यात्मिक होळी’ सण मोठ्या उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरा करण्यात आला, या सोहळ्याची सुरुवात ईश्वरीय स्मृती आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी साधना दिदी यांनी होळीचे आध्यात्मिक महत्त्व विशद करताना सांगितले की, “ज्याप्रमाणे आपण लाकडे पेटवून होळी साजरी करतो, त्याप्रमाणे आपल्यातील काम, क्रोध, लोभ, मोह आणि अहंकार या पाच विकारांची होळी करणे हीच खरी होळी आहे. जेव्हा आपण परमपिता परमात्मा शिवाच्या स्मृतीत राहतो, तेव्हा आपल्या जीवनात सुखाचा आणि शांतीचा रंग भरला जातो.”

या कार्यक्रमात पारनेर परिसरातील अनेक भाविक आणि पाहुणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘ईश्वरीय रंगांची उधळण’. यामध्ये कोणत्याही रासायनिक रंगाचा वापर न करता, फुलांच्या वर्षावाने आणि आध्यात्मिक गाण्यांच्या तालावर सर्वांनी आनंद साजरा केला.उपस्थितांसाठी विशेष ‘राजयोग’ ध्यानाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामुळे मनाला शांती आणि प्रसन्नता लाभली. विद्यालयाच्या सदस्यांनी होळीच्या आध्यात्मिक अर्थावर आधारित छोटेखानी नाटिका आणि नृत्य सादर केले. उपस्थित भाविकांनी ‘आजपासून मी वाईट सवयींचा त्याग करेन’ अशी प्रतिज्ञा यावेळी घेतली.साधना दिदी पुढे म्हणाल्या की, “परस्परांमधील भेदभाव विसरून प्रेम आणि स्नेहाने एकत्र येणे हीच काळाची गरज आहे. ईश्वरी ज्ञानाचा रंग एकदा लागला की मानवी जीवन सुगंधित होते.” कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना ईश्वरीय प्रसाद आणि टोलीचे वाटप करण्यात आले.

या सोहळ्याला पारनेर शहरातील प्रतिष्ठित नागरिक, महिला आणि युवकांची मोठी उपस्थिती होती. अत्यंत शिस्तबद्ध आणि पवित्र वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याने उपस्थितांच्या मनावर आध्यात्मिकतेची मोहिनी घातली.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments