Wednesday, November 25, 2026
Google search engine
Homeमहाराष्ट्र५५० शिवभक्तांनी अनुभवला पन्हाळगड ते पावनखिंड भटकंती चा थरार

५५० शिवभक्तांनी अनुभवला पन्हाळगड ते पावनखिंड भटकंती चा थरार



हिंदवी परीवार – डॉ.शिवरत्न शेटे यांच्या व्याख्यानाने अंगावर रोमांच 

पारनेर / भगवान गायकवाड, 
कोसळणारा पावसाच्या धारा अंगावर झेलत, घनदाट जंगलातून मार्ग काढीत, चिखलात रुतून बसलेले पाय बाहेर काढून पुन्हा नयनरम्य धबधबा मध्ये भिजणारी तरुणाई , जय शिवराय, हरहर महादेव चा जंगल,दरी खो- यात घुसलेल्या निनादात व हिंदवी परीवाराचे संस्थापक प्रसिद्ध शिवव्याख्याते डॉ शिवरत्न शेटे यांच्या व्याख्यानाने अंगावर उभे राहिलेले रोमांच ने राज्यातील 550 शिवभक्तांनी पन्हाळगड ते पावनखिंड भटकंती मोहीमेचा थरार अनुभवला.
हिंदवी परीवाराचे संस्थापक अध्यक्ष डॉ शिवरत्न शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वीस वर्षे पासून छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे नरवीर शिवा काशिद, बाजीप्रभू देशपांडे यांच्या सह शेकडो मावळ्यांच्या स्मृती ला उजाळा देण्यासाठी पन्हाळगड ते पावनखिंड पदभ्रमंती मोहीम राबविण्यात येते. यावर्षी 18 जुलै ते 20 जुलै मध्ये हि मोहीम राबविण्यात आली. राष्ट्र प्रथम वंदे मातरम् हे ब्रीदवाक्य घेऊन राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून सुमारे 550 शिवभक्त मोहीमेला सहभागी झाले होते. शुक्रवारी सकाळी पन्हाळगडावर नरवीर शिवा काशीद व बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यास वंदन करून मोहीम सुरू झाली.पुसाटी बुरूज मार्गे म्हाळुंगे मसाई च्या पठारावर डॉ शिवरत्न शेटे यांच्या व्याख्यानाने शिवभक्त मंत्रमुग्ध झाले.रात्री खोतवाडी ला मुक्काम झाला. दुसया दिवशी खोतवाडी, आंबेवाडी, रिंगेवाडी, म्हसवड, पाटेवाडी, धनगरवाडा मार्गे नद्या,ओढे पार करीत घनदाट जंगलातून मार्ग काढीत चिखलात रुतून बसलेले पाय बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करीत धो धो पडणारा पाऊस अंगावर झेलत तब्बल 28 किलोमीटर चा प्रवास करीत रात्री शिवभक्त पांढरपाणी मध्ये पोहोचले. राहुरी चे प्रसिद्ध गीतकार, शाहीर गणेश शिंदे यांनी गायलेली शिवरायांची स्फुर्ती गीते, पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील प्रसिद्ध गायक व मोहीम विभाग प्रमुख संभाजी आढाव यांनी म्हणलेल्या गीतांनी मोहीमेतील शिवभक्तांना उर्जा मिळाली. माजलगाव येथील अण्णासाहेब मोरे आयुर्वेद महाविद्यालय च्या विद्यार्थ्यांनी केलेली आरोग्यसेवा सामाजिक स्फुर्ती देणारी ठरली.रविवारी सकाळी चार किलोमीटर अंतर पार करीत पावनखिंड मध्ये शिवभक्तांनी नरवीर बाजीप्रभू देशपांडे व सर्व मावळ्यांच्या स्मृती ना वंदन केले. हिंदवी परीवाराचे संस्थापक डॉ शिवरत्न शेटे यांनी त्यांच्या ओघवत्या शैलीतून पन्हाळगड ते पावनखिंड मधील मावळ्यांच्या पराक्रमाची सांगीतलेली शौर्य गाथा शिवभक्तांच्या अंगावर रोमांच आणणारी ठरली. हिंदवी परीवाराचे सचिव डॉ संभाजी भोसले यांनी आभार मानले. यावेळी माजी मंत्री बच्चू कडू,आयुषमान भारत मिशन महाराष्ट्रचे प्रमुख डॉ.ओमप्रकाश शेटे यांनी  सर्वांना आयुष्मान भारतचे कार्ड काढून घेण्याचे आवाहन केले. .मोहीम सरनोबत महेश शिंदे , सचिव  डॉक्टर संभाजी भोसले,  कोअर कमिटीतील सर्व सदस्य सौ डॉ. सुप्रज्ञा शेटे श्री. वसंतराव झावरे, दिलीप मेसरे,  संभाजी जाधव , ऋषिकेश सोनार, अर्चना शिंदे, भुषण बापट , जगन्नाथ राऊत  , संतोष शेटे , साईनाथ,  उमेश भालसिंग, महेश जगताप , विजय पोखरकर, समाधान औताडे,  धारेश्वर तोडकरी, अजय भोयर या सर्वांनी मोहीम पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. अहिल्यानगर जिल्ह्यातील वैभव पठारे, संभाजी जाधव, योगेश भुसारी, वसंतराव झावरे, उमेश भालसिंग, काशिनाथ आंधळे, गणेश डेरे,सतिश इंगळे, गणेश शिंदे, विनोद गोळे,बाळासाहेब डोंगरे, शेषराव देशमुख, एस . बी शेटे, सोनल झावरे, विठ्ठल सोले  श्रद्धा  सोनार, डॉ बी.के शिरसाठ, यश बेल्हेकर, भरत बेल्हेकर, अनिल लुक्कड, सुशांत आरंगळे , रामदास गरड, विवेक धावणे, अतुल खाडे, देवदान गायकवाड, लक्ष्मीकांत बनसोडे , उमेश भालसिंग, ॲड.किरण तहकीक,ॲड. सुहास चव्हाण, अभिषेक ठलाल, राम सवासे, तुकाराम सावसे , परमेश्वर तहकीक यासह अनेक शिवभक्त मोहिमेत सहभागी झाल होते. हिंदवी परीवार चे पन्हाळगड ते पावनखिंड पदभ्रमण मोहीम मध्ये राज्यातील व कर्नाटक मधील अनेक उच्च पदस्थ अधिकारी, आयटी इंजिनियर, शिक्षक, डॉक्टर व युवकांचा मोठा सहभाग होता. 
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments