महायुतीच्या ६ नगरसेवकांची निवडीला दांडी
पारनेर / भगवान गायकवाड,
पारनेर नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदी सुप्रिया सुभाष शिंदे यांची बिनविरोध निवड झाली असून या निवडीला महायुतीच्या ६ नगरसेवकांनी या उपनगराध्यक्ष निवडीला दांडी मारली होती.तर नगराध्यक्ष पदी डॉ विद्या कावरे तर उपनगराध्यक्ष पदी सुप्रिया शिंदे यांची निवड झाल्याने पारनेर नगरपंचायत मध्ये महिलाराज आले आहे.
पारनेर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष जायदा शेख यांनी १७ नोव्हेंबर रोजी नगराध्यक्षा डॉ विद्या बाळासाहेब कावरे यांच्या कडे राजीनामा दिला होता त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर उपनगराध्यक्ष पदासाठी
सोमवारी एकमेव सुप्रिया सुभाष शिंदे यांचा अर्ज दाखल असल्याने प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर व साह्य अधिकारी सीईओ प्रियंका शिंदे यांनी बिनविरोध निवड जाहीर केली.
यावेळी दिपक लंके, जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, डॉ. बाळासाहेब कावरे, सभापती योगेश मते, माजी नगराध्यक्ष नितीन आडसुळ, सभापती सौ. सुरेखा भालेकर, सभापती प्रियंका औटी, नगरसेवक भुषण शेलार, माजी उपनगराध्यक्ष जायदा शेख, सचिन औटी, नगरसेविका हिमानी नगरे, नगरसेविका विद्या गंधाडे, कारभारी पोटघन, बाळासाहेब नगरे, राजु शेख, ऋषीकेश गंधाडे, चंदु कावरे, सखाराम बुगे, स्विकृत नगरसेवक मंगेश औटी, राष्ट्रवादी शहराध्यक्ष बंडु गायकवाड, शहराध्यक्ष अमित जाधव, रामदास कावरे, दगडु कावरे, सिताराम बुगे, बाळासाहेब भुसारे, मोहन कावरे, रावसाहेब कावरे, नवनाथ बुगे, विजय बूगे, संदिप थोरात, कोंडिभाऊ थोरात, दिपक नाईक उपस्थित होते. उपनगराध्यक्ष निवडीला राष्ट्रवादी काँग्रेस पारनेर आघाडी व्हिप गटनेता योगेश मते यांनी माजी नगराध्यक्ष विजय औटी यांच्या सह १० नगरसेवकांना बजावला होता. परंतु विरोधात अर्ज नसल्याने मतदानाची वेळ आली नाही त्यामुळे शिंदे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.




