Wednesday, November 25, 2026
Google search engine
Homeपारनेरधोत्रे खुर्द येथे घर तिथे ज्ञानेश्वरी उपक्रम; जीवन संपन्न होण्याकरता ज्ञानेश्वरी ची...

धोत्रे खुर्द येथे घर तिथे ज्ञानेश्वरी उपक्रम; जीवन संपन्न होण्याकरता ज्ञानेश्वरी ची गरज : बाबा महाराज खामकर

पारनेर/प्रतिनिधी : 
ज्ञानेश्वरी केवळ धार्मिक ग्रंथ नसून जीवनाला दिशा देणारी मार्गदर्शिका आहे. ती मनाला शांती, समाधान आणि सकारात्मकता प्रदान करते. यातील तत्त्वज्ञान आत्मसात केल्यास व्यक्ती आपल्या कर्तव्यातून मुक्त होऊन, नीतिमत्तेच्या मार्गावर चालते असे मत भागवताचार्य ह भ प बाबा महाराज खामकर यांनी व्यक्त केले.
पारनेर तालुक्यातील धोत्रे (खु.) येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने ‘घर तेथे ज्ञानेश्वरी’ या उपक्रमांतर्गत ग्रंथराज ज्ञानेश्वरी वाटप सोहळा, प्रवचन आणि फराळ महाप्रसादाचे आयोजन रविवारी, ६ जुलै २०२५ रोजी उत्साहात संपन्न झाले. श्री संत सद्गुरु बाळूमामा भक्त मंडळ, कुमार यश भैय्या राहणे मित्रपरिवार आणि समस्त धोत्रे ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी भागवताचार्य ह.भ.प. बाबा महाराज खामकर यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाचे महत्त्व आणि आध्यात्मिक मार्गदर्शन यावर प्रवचन केले. त्यांच्या प्रवचनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मोहनराव रोकडे, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते संभाजी रोहकले, शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे, युवा नेते यशोदीप राहणे, सतीश सासवडे, विशाल गागरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे वाटप करून गावातील प्रत्येक घरापर्यंत हा आध्यात्मिक ठेवा पोहोचविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमात गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. प्रवचनानंतर सर्वांना फराळ महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. या उपक्रमाने गावात धार्मिक आणि सामाजिक एकतेचा संदेश दिला. यशोदीप राहणे यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि अशा उपक्रमांद्वारे गावातील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा जपण्याचे आवाहन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळूमामा भक्त मंडळ आणि ग्रामस्थांनी केलेल्या प्रयत्नांचे सर्वांनी कौतुक केले.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments