Wednesday, November 25, 2026
Google search engine
Homeपारनेरव्यवसायाशी प्रामाणिक रहा यश हमखास : आ. काशिनाथ दाते सर

व्यवसायाशी प्रामाणिक रहा यश हमखास : आ. काशिनाथ दाते सर


‘माय फोन कॉर्नर शुभारंभाने उद्योजकतेचा नवा अध्याय’!

पारनेर | ता. प्रतिनिधी,  

शुक्रवार दि. १० एप्रिल २०२६ आजच्या डिजिटल युगात मोबाईल फोन ही केवळ सुविधा नसून प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक गरज बनली आहे. त्यामुळे या क्षेत्रात प्रचंड संधी उपलब्ध असून गणेश औटी व भुषण लटांबळे यांनी निवडलेला व्यवसाय दूरदृष्टीचा व भविष्यकालीन दृष्टिकोन असलेला असून त्यांच्या माध्यमातून आज सुरु होत असलेल्या ‘माय फोन कॉर्नर’च्या शुभारंभाने उद्योजकतेचा नवा अध्याय सुरू होत असून व्यावसायाशी प्रमाणिक रहा यश हमखास येते असे मत आमदार काशिनाथ दाते सर यांनी पारनेर शहरातील नवी पेठ परिसरात सुरू झालेल्या ‘माय फोन कॉर्नर’ या आधुनिक मोबाईल शोरूमच्या शुभारंभ प्रसंगी व्यक्त केले 

या शुभारंभ प्रसंगी माजी नगराध्यक्ष विजुभाऊ औटी, मा. जिल्हा परिषद सदस्य राजाभाऊ एरंडे, नगरसेवक अशोक चेडे, राजेंद्र औटी, अॅड. तुषार औटी, उद्योजक रामदास मते, धोंडिभाऊ पुजारी, संभाजी मगर, सरपंच देवा लटांबळे, उद्योजक दादाभाऊ लटांबळे, अर्जुन लंके, गोपी गाडगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आमदार काशिनाथ दाते बोलताना पुढे म्हणाले की, “मोबाईल विक्रीसोबतच ग्राहकांना दर्जेदार सेवा देणे, नवीन तंत्रज्ञानाची माहिती ठेवणे, योग्य मार्गदर्शन करणे आणि विश्वासार्हता टिकवणे ही या व्यवसायातील यशाची खरी गुरुकिल्ली आहे. आज ग्राहक केवळ वस्तू खरेदी करत नाही, तर तो विश्वास आणि सेवा शोधत असतो. त्यामुळे विक्रीनंतरची सेवा, योग्य किंमत, आणि ग्राहकांशी प्रामाणिक व्यवहार हे या व्यवसायात अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत.”

“कोणताही व्यवसाय करताना प्रामाणिकपणा, सातत्य आणि चिकाटी या तीन गोष्टी अत्यावश्यक आहेत. या गुणांच्या जोरावर कोणताही व्यवसाय यशाच्या शिखरावर पोहोचतो. तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजकतेकडे वळणे ही काळाची गरज असून अशा उपक्रमांमुळे स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीलाही चालना मिळते,” असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

पारनेर शहरातील या कार्यक्रमास स्थानिक नागरिकांची व व्यवसायिकांची मोठी उपस्थिती यावेळी जाणवली असून, ‘माय फोन कॉर्नर’ नव्या व्यवसायामुळे पारनेरच्या व्यापारी क्षेत्रात नवचैतन्य निर्माण झाल्याची भावना उपस्थितांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली.

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
 “‘माय फोन कॉर्नर’ हा व्यवसाय केवळ विक्रीपुरता मर्यादित न राहता ग्राहकांच्या विश्वासाचा केंद्रबिंदू ठरावा आणि आपल्या युवकांनी प्रगतीची नवी उंची गाठावी,” तंत्रज्ञानाच्या नव्या युगात तुमची वाटचाल यशस्वी होवो! युवकांनी व्यवसायातून प्रगती करावी, युवक सक्षम तर देश सक्षम, व्यवसाय हाच खरा मार्ग आहे, उद्योजक बना, प्रगतीचा नवा अध्याय लिहा माझ्या शुभेच्छा तुमच्या बरोबर आहेत. 

– आ. काशिनाथ दाते सर 
(विधानसभा सदस्य)
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments