Friday, November 27, 2026
Google search engine
Homeपारनेरग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धेच्या युगात सक्षमपणे उभे राहावेत : मंगेश दाते

ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धेच्या युगात सक्षमपणे उभे राहावेत : मंगेश दाते


पारनेर / ता. प्रतिनिधी 

मंगळवार दि. १० फेब्रुवारी २०२६ पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या सेस फंडातून जवळे येथील श्री. धर्मनाथ विद्यालयातील १० विद्यार्थ्यांना सायकल वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास आमदार दाते सर यांचे चिरंजीव, श्री. मंगेशशेठ दाते हे प्रमुख उपस्थित होते.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक सोयी उपलब्ध व्हाव्यात, शाळेत ये–जा करणे सुलभ व्हावे आणि विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास अधिक गतीमान व्हावा, या उद्देशाने ही सायकल वाटप योजना राबविण्यात येत असल्याचे दाते यांनी यावेळी स्पष्ट केले. या कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती किसनराव रासकर, रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभाग सल्लागार समन्वयक संदीपराव सालके, संभाजी काका सोमवंशी, प्रदिप सोमवंशी, संतोष सालके, मंगेश सालके, कैलास शेळके, संपतराव सालके, गोपाळे काका, सोनालीताई ढवळे, महेंद्र पठारे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंगेशशेठ दाते म्हणाले की, आमदार काशिनाथ दाते सर हे सातत्याने समाजातील विविध घटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असून जवळे गावच्या विकासासाठी त्यांनी नेहमीच झुकते माप दिले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धेच्या युगात सक्षमपणे उभे राहावेत, यासाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यावर आमदार दाते सर यांचा नेहमीच भर राहिला आहे. यावर्षी धर्मनाथ विद्यालयातील मागणी अर्जच मर्यादित होते. त्यामुळे कमी विद्यार्थ्यांना सायकल अनुदानाचा लाभ मिळाला असला, तरी पुढील वर्षी अधिकाधिक विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
 कोणत्याही क्षेत्रातील प्रगती ही सामूहिक प्रयत्नांवर अवलंबून असते. आमदार काशिनाथ दाते सरांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून विकासकामे राबविण्याचा संकल्प आपण सर्वांनी करावा. या उपक्रमामुळे लाभार्थी विद्यार्थी व पालकांमध्ये समाधान व्यक्त होत असून आमदार दाते सरांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

– मंगेश दाते, उद्योजक पारनेर
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments