Thursday, November 26, 2026
Google search engine
Homeपारनेरभाळवणी, निघोज, देसवडेच्या आरोग्य सुविधांसाठी आ. दातेंची मंत्री ना. आबिटकरांना निधीची मागणी

भाळवणी, निघोज, देसवडेच्या आरोग्य सुविधांसाठी आ. दातेंची मंत्री ना. आबिटकरांना निधीची मागणी


नवीन इमारतींसाठी प्रशासकीय मान्यतेकरीता आ. दातेंचा शासनदरबारी पुढाकार

पारनेर / ता. प्रतिनिधी,  

पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील आरोग्य सुविधांना बळकटी देण्यासाठी आमदार काशिनाथ दाते सर यांनी आज, २७ ऑक्टोबर रोजी मुंबई मंत्रालय येथे राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन भाळवणी व निघोज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि देसवडे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या नवीन इमारतींसाठी प्रशासकीय मान्यता व आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. या तीनही कामांसाठी आमदार दाते सरांनी अधिकृत पत्रव्यवहार करत शासनाचे लक्ष वेधले असून, सबंधित खात्याच्या मंत्र्यांची प्रत्यक्ष मंत्रालयात भेट घेऊन या प्रस्तावांचा पाठपुरावा केला आहे.

भाळवणी आणि निघोज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या विद्यमान इमारती जुन्या व जीर्ण झाल्यामुळे आरोग्य सेवा पुरविताना अडचणी निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार काशिनाथ दाते सर यांनी यापूर्वीच ना. प्रकाश आबिटकर यांना पत्र देऊन दोन्ही आरोग्य केंद्रांच्या नवीन इमारतींच्या बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता आणि निधीची मागणी केली होती. तसेच, देसवडे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासाठी नवीन इमारत उभारण्याच्या प्रस्तावाला मान्यता मिळावी, यासाठी आज स्वतंत्र पत्राद्वारे शासनाकडे मागणी नोंदवली होती. या उपकेंद्राच्या इमारतीसाठी आवश्यक जागाही उपलब्ध असल्याचे त्यांनी सबंधित पत्रात नमूद केलेले आहे.

🔶🔶🔶🔶🔶🔶
 मतदारसंघात ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्य सेवा मिळावी, हा या मागण्यांमागील मुख्य उद्देश आहे. केवळ पत्र देऊन न थांबता संबंधित मंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निधी आणि प्रशासकीय मान्यता देण्याची मागणी केली. या तीनही प्रस्तावांना शासनाची मंजुरी मिळाल्यास संबंधित गावांसह परिसरातील नागरिकांना अधिक सक्षम आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सबंधित अधिकाऱ्यांना या मागणीचा आराखड्यात समावेश करत पुढील कार्यवाही निर्देश दिले आहे.

आ. काशिनाथ दाते सर
(विधानसभा सदस्य)
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments