अंजना सोशल फौन्डेशनचा स्तुत्य उपक्रम; मॅट रांगोळी, केक, साबण बनवण्यासह अनेक कौशल्ये शिकण्याची संधी
पारनेर / प्रतिनिधी,
महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने, अंजना सोशल फौन्डेशनतर्फे कै. अंजनाबाई यादवराव कोरडे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त मोफत व्यवसाय/उद्योजकता विकास प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे महत्त्वाचे शिबिर दिनांक १६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता जवळा आणि कान्हूर पठार या दोन्ही ठिकाणी सुरू होणार आहे.
महिलांना घरबसल्या छोटे उद्योग सुरू करता यावेत यासाठी या शिबिरात बाजारपेठेत मागणी असलेले सहा महत्त्वाचे व्यवसाय कौशल्ये शिकवली जाणार आहेत, ज्यामुळे महिलांना उत्पादक बनण्यास मदत होईल.
• मॅट रांगोळी प्रशिक्षण
• हलव्याचे दागिने बनविणे प्रशिक्षण
• साबण व फिनाइल प्रशिक्षण (उत्पादन)
• केक बनविणे प्रशिक्षण
• कापडी व कागदी फुले प्रशिक्षण
• ब्लाऊज डिझाईन प्रशिक्षण
📍 *शिबिराचे स्थळ आणि वेळ*:
• जवळा– विठ्ठल रुक्मिणी मंदिर, जवळा १६ डिसेंबर, स. ११ वा.
• कान्हूर पठार– मळगंगा मंदिर, कान्हूर पठार १६ डिसेंबर, स. ११ वा.
नाव नोंदणी आणि संपर्क:*
या मोफत शिबिरात सहभागी होण्यासाठी इच्छुक महिलांनी त्वरित खालील संपर्क क्रमांकावर आपले नाव नोंदवावे, असे आवाहन अंजना सोशल फौन्डेशनने आणि भाजपा राज्य परिषद सदस्य मा.श्री. विश्वनाथ दादा कोरडे यांनी केले आहे.
• जवळा– सौ. सोनालीताई सालके 9860080496
• कान्हूर पठार– सौ. अर्चनाताई लोंढे 7083851676
कै. अंजनाबाई यादवराव कोरडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित या प्रशिक्षणामुळे ग्रामीण भागातील महिलांना उद्योजकतेची पहिली पायरी चढण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. महिलांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.




