पारनेर / प्रतिनिधी,
अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हा प्रसिद्ध प्रमुखपदी पारनेर शहरातील संभाजीनगर मधील पत्रकार भगवानराव गायकवाड यांची संगमनेर येथे झालेल्या अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हा बैठकीमध्ये सर्वानुमते एकमताने अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे प्रांत अध्यक्ष तसेच केंद्रीय पदाधिकारी यांचे निर्देशनुसार नियुक्ती करण्यात आली.
यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे प्रांत अध्यक्ष बाळासाहेब औटी, केंद्रीय पदाधिकारी सूर्यकांत पाठक, जिल्हा उपाध्यक्ष अरुण शेवाळे,(सर), सुरेश राहाणे, जिल्हा सचिव दिनेश थोरात, सहसचिव सीताराम बोरुडे, महिला अध्यक्षा अमिता कोहली, माजी जिल्हाध्यक्ष अतुल कुऱ्हाडे, नूतन जिल्हाध्यक्ष शाहूराव औटी (सर), कोषाध्यक्ष डॉ. अप्पासाहेब नरोडे, संघटक बाळासाहेब कोकाटे, रोजगार सृजन प्रमुख पत्रकार दत्तात्रय झगडे, पर्यावरण प्रमुख भाऊ कुलट आदी मान्यवर उपस्थित होते.




