Thursday, November 26, 2026
Google search engine
Homeअहिल्यानगरअखिल भारतीय ग्राहक पंचायत हि सर्वसामान्य ग्राहकांची हितकारक संस्था - शाहुराव औटी

अखिल भारतीय ग्राहक पंचायत हि सर्वसामान्य ग्राहकांची हितकारक संस्था – शाहुराव औटी


अखिल भारतीय ग्राहक पंचायतची जिल्हा कार्यकारणी बैठक संपन्न


पारनेर / भगवान गायकवाड, 
अखिल भारतीय ग्राहक पंचायत ही सर्वसामान्य ग्राहकांच्या हितासाठी कार्यरत असलेली संस्था आहे. ग्राहकांना त्यांचे हक्क आणि जबाबदाऱ्यांबाबत जागरूक करणे, त्यांना फसवणूक आणि गैरव्यवहारापासून संरक्षण देणे यासाठी संस्था विविध माध्यमांचा वापर करते, असे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे नूतन जिल्हाध्यक्ष शाहूराव औटी यांनी केले. ते अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे आयोजित जिल्हा कार्यकारणी बैठकीत बोलत होते.

या बैठकीला प्रांत अध्यक्ष बाळासाहेब औटी, केंद्रीय पदाधिकारी सूर्यकांत पाठक, जिल्हा उपाध्यक्ष अरुण शेवाळे, सुरेश राहाणे, जिल्हा सचिव दिनेश थोरात, सहसचिव सीताराम बोरुडे, जितेंद्र पितळे, कोषाध्यक्ष डॉ. अप्पासाहेब नरोडे, महिला अध्यक्ष तथा आयाम प्रमुख अमिता कोहली, पर्यावरण आयाम प्रमुख अरुण कुलट, प्रचार आयाम प्रमुख कारभारी गरड, विधी आयाम प्रमुख संदीप गवळी, रोजगार सृजन आयाम प्रमुख दत्तात्रय झगडे, ग्राहक मार्गदर्शन सेवा आयाम प्रमुख हरिभाऊ चौधरी, जिल्हा प्रसिद्धी आयाम प्रमुख पत्रकार भगवानराव गायकवाड, तसेच कार्यकारणी सदस्य रामकृष्ण थोटे, द्यानदेव फसले, प्रवीण जोशी, बाळासाहेब कोकाटे, विनायक वाडेकर, सुभाष राहणे, रोशन कोथमिरे, सीताराम पानसरे, सौरभ म्हसाळकर, यादव फडतरे, अश्विनी भालेराव, सुनीता पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

शाहूराव औटी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, अखिल भारतीय ग्राहक पंचायत ग्राहकांच्या हितासाठी कटिबद्ध आहे. ग्राहकांना त्यांच्या हक्कांबाबत जागरूक करणे, चांगल्या गुणवत्तेची उत्पादने, योग्य किंमत आणि अचूक वजन मिळावे यासाठी प्रयत्न करणे, तसेच ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण करणे हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments