Thursday, November 26, 2026
Google search engine
Homeअहिल्यानगरअहिल्यानगरमध्ये १० वी, १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न!; आमदार संग्रामभैय्या...

अहिल्यानगरमध्ये १० वी, १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न!; आमदार संग्रामभैय्या जगताप यांच्या हस्ते खुशी आढाव हिचा विशेष सत्कार



अहिल्यानगर / भगवान गायकवाड, 

        सिंधू मंगल कार्यालय, बोरुडे मळा येथे रविवार, दिनांक ३१ मे २०२६ रोजी इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा नगरसेविका महिला व बालकल्याण समिती सभापती पुष्पाताई अनिल बोरुडे आणि माजी उपमहापौर अनिल बोरुडे यांच्या विद्यमाने भव्य गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.हा सोहळा उत्साहात पार पडला. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघाचे हिंदुत्ववादी आमदार संग्रामभैय्या जगताप उपस्थित होते. तसेच माजी महापौर आणि प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, बाबासाहेब वाकळे, उपमहापौर धनंजय जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संपतदादा बारस्कर, माजी उपमहापौर अनिल बोरुडे आणि महिला तथा बालकल्याण समितीच्या सभापती पुष्पाताई अनिल बोरुडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.


या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार मंडळाच्या जिल्हा समन्वय अधिकारी सविताताई आढाव आणि अमर आढाव यांची कन्या खुशी अमर आढाव हिचा झालेला विशेष सत्कार. खुशीने नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९१.४०% गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. तिच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आमदार संग्रामभैय्या जगताप यांच्या हस्ते तिला सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. “विद्यार्थ्यांनी कष्टाच्या जोरावर मिळवलेले हे यश त्यांच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी आहे. खुशीसारख्या विद्यार्थ्यांनी कठीण परिश्रमाने मिळवलेले गुण इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरतील,” असे गौरवद्गार आमदार संग्रामभैय्या जगताप यांनी या प्रसंगी काढले.

 कार्यक्रमादरम्यान इतरही गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपस्थित पालकांनी आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. दहावीच्या परीक्षेत ९१.४०% गुणांची उत्तुंग भरारी घेणाऱ्या खुशी आढाव हिचे आणि तिच्या पालकांचे सध्या सर्व स्तरातून, तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातून भरभरून कौतुक होत आहे. या सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक नवा उत्साह आणि ऊर्जा पाहायला मिळाली.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments