Friday, November 27, 2026
Google search engine
Homeपारनेरअहिल्यानगर येथे होणार युनिटी ऑफ मूलनिवासी समाज संघटनेचे दुसरे महाराष्ट्र राज्य अधिवेशन

अहिल्यानगर येथे होणार युनिटी ऑफ मूलनिवासी समाज संघटनेचे दुसरे महाराष्ट्र राज्य अधिवेशन

 १० ऑगस्ट २०२५ रोजी होणार अधिवेशन 

पारनेर / प्रतिनिधी,

युनिटी ऑफ मूलनिवासी समाज संघटनेचे दुसरे महाराष्ट्र राज्य अधिवेशन येत्या १० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय, स्वस्तिक चौक, पुणे एसटी स्टँड समोर, अहिल्या नगर येथे आयोजित करण्यात आले आहे. प्रा. डॉ. हरी नरके यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित या अधिवेशनाचे उद्घाटन डॉ. विजयकुमार ठुबे (ज्येष्ठ मार्गदर्शक, मराठा सेवा संघ, अहिल्या नगर) करणार असून, अध्यक्षता मा. कमलाकांत काळे (राष्ट्रीय अध्यक्ष, युनिटी ऑफ मूलनिवासी समाज) करणार आहेत.

या अधिवेशनात विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि सामाजिक विचारवंत मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनात समाजातील ज्वलंत विषयांवर सखोल विचारमंथन होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील विषयांचा समावेश आहे. यामध्ये जाती आधारित जनगणना, एनपीआर आणि अनुसूचित जाती-जमाती आरक्षणातील उपवर्गीकरण: शासक वर्गाची भूमिका – एक गंभीर विश्लेषण, एनपीआर हीच खरी एनआरसी: गंभीर चर्चा, स्वर्णिम भारताच्या पुनर्निर्मितीत विद्यार्थी, युवा, महिला आणि बुद्धिजीवी वर्गाची भूमिका, मुलनिवासी बहुजन समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक ध्रुवीकरणाशिवाय ब्राह्मणी षडयंत्रांना मुकाबला करणे शक्य नसल्याचा मुद्दा अशा अनेक विषयांवर चर्चा होणार आहे.

अधिवेशनाचा मुख्य उद्देश बहुजन समाजात सामाजिक ऐक्य निर्माण करणे आणि सहकार, समन्वयाने संविधानिक हक्क आणि अधिकार मिळवणे हा आहे. युनिटी ऑफ मूलनिवासी समाज संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्र करंदीकर, प्रदेशाध्यक्ष प्रा. अजित खरसडे, मिलिंद सुर्वे, बी. एच. नितनवरे, नामदेव राळेभात, सौरव बोरुडे, शरद नगरे, संजय सावंत, सारंग घोडेस्वार, संजय कांबळे, रफिक शेख, नामदेव गुरव, शामराव काते, प्रमोद कांबळे, अयुब बागवान, दीक्षा बचाटे, माही सूर्यवंशी, पुष्पाराणी बनकर यांनी बहुजन समाजातील विद्यार्थी, युवा, महिला आणि बुद्धिजीवी वर्गाला या अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून तन, मन आणि धनाने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

अधिवेशनात सामाजिक परिवर्तनासाठी रचनात्मक चर्चा आणि ठोस उपाययोजनांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. हा कार्यक्रम बहुजन समाजाच्या एकजुटीसाठी आणि संविधानिक हक्कांच्या रक्षणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments