Friday, November 27, 2026
Google search engine
Homeपारनेरआमदार दातेंच्या नेतृत्वाखाली पारनेर राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक संपन्न

आमदार दातेंच्या नेतृत्वाखाली पारनेर राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक संपन्न


पारनेर / ता. प्रतिनिधी,  

शुक्रवार दि. २४ एप्रिल २०२६ पारनेर शहरातील जिल्हा बँकेच्या सभागृहात पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न झाली. आगामी राजकीय व संघटनात्मक वाटचालीस दिशा देणारी ही बैठक ठरली असून, मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती यावेळी पाहायला मिळाली.


या बैठकीस जिल्हाध्यक्ष अशोकराव सावंत, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, ज्येष्ठ नेते प्रभाकर शेठ कवाद, मतदारसंघ अध्यक्ष विजुभाऊ औटी, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव चेडे, जिल्हा कार्याध्यक्ष सुधामती कवाद, तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर, जिल्हा उपाध्यक्ष सोनाबाई चौधरी, युवा तालुकाध्यक्ष भास्कर उचाळे, महिला तालुकाध्यक्षा सुषमा रावडे, डी. आर. शेंडगे, युवती तालुकाध्यक्ष अपर्णा खामकर, उपाध्यक्ष रेश्मा गलांडे, आर. एस. कापसे, डॉ. प्रदीप दाते, मंगेश शेठ दाते, हरिष काका दावभट, राजेंद्र औटी, अनिल देठे, गोकुळ मामा काकडे, साहेबराव वाफारे, प्रदीप वाळुंज, देवराम मगर, अंजुम पठाण, सोनाली कुलथे, निलम गोसावी, अनिल मदगे, रामदास ढोले, संतोष सालके, पिनु रोहोकले, सुभाष सासवडे, संतोष मोरे, बाळासाहेब सोबले, बाबासाहेब दाते, बाळासाहेब रोकडे, सुभाष ठाणगे, राहुल तामखडे, जयसिंग कर्डिले, गणेश शिंदे, अक्षय गोरडे, सुनील रोकडे, अंकुश काशिद यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


बैठकीदरम्यान पक्ष संघटन अधिक सक्षम करण्यावर विशेष भर देण्यात आला. नव्या पदाधिकाऱ्यांवर जबाबदाऱ्या निश्चित करत त्यांना सक्रिय व जबाबदारीने काम करण्याचे निर्देश देण्यात आले. शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, असे स्पष्टपणे सांगण्यात आले. तसेच बी.एल.ए. नेमणुकीबाबत कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी शासकीय कार्यालयांमध्ये संघटनात्मक पदांचा योग्य वापर करत सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देणे आणि त्यातून स्वतःची सकारात्मक ओळख निर्माण करणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक जबाबदार पदाधिकारी म्हणुन मिरवत असताना आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले. 

मतदार संघात विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रवादी-महायुतीची सत्ता प्रस्थापित झालेली असल्याने राष्ट्रवादी पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आपली नैतिक जबाबदारी ओळखून गावपातळीवरील गटतटाचे राजकारण बाजूला ठेवून उद्याच्या काळात विकासाभिमुख राजकारणाची पायाभरणी करण्यावर विशेष भर द्यावा, असेही आमदार दाते यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना स्पष्ट केले.

कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन करत जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी प्रामाणिकपणा, सातत्य आणि जनसंपर्क या गोष्टींवर भर दिला. या बैठकीमुळे पक्ष संघटन अधिक मजबूत होऊन विकासाच्या कामांना गती मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

🔶🔶🔶🔶🔶🔶
🔹 बैठकीदरम्यान संघटन बळकटीसाठी राष्ट्रवादी दिव्यांग सेलच्या अध्यक्षपदी पळसपुरचे रविंद्र धोंडीबा आहेर, तालुका राष्ट्रवादी सहकार सेलच्या अध्यक्षपदी टा. ढोकेश्वर येथील बबनराव पायमोडे सर, सामाजिक न्याय विभागाच्या कार्याध्यक्षपदी वडगाव सावताळचे दत्तात्रय तुळशीराम सरोदे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उपाध्यक्षपदी अळकुटी येथील सुरेश काशिनाथ परंडवाल, राष्ट्रवादी पदवीधर सेलच्या अध्यक्षपदी धोत्रेचे राहुल सासवडे, पारनेर शहराध्यक्षपदी राजेंद्र औटी आणि उपाध्यक्षपदी सुनील गाडगे यांची निवड करण्यात आली असून या नियुक्त्यांमुळे पक्ष संघटन अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक जबाबदार घटक म्हणुन मी अभिनंदन करतो व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत असतानाच पक्षीय जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडत संघटन अधिक मजबूत करण्याचे त्यांना आवाहन करतो.


-आमदार काशिनाथ दाते सर
(विधानसभा सदस्य)
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments