Thursday, November 26, 2026
Google search engine
Homeपारनेरउद्योजक सचिन नरवडे, इंजि. प्रवीण फलके यांचा स्तुत्य पुढाकार; युवा फाऊंडेशनच्या माध्यमातून...

उद्योजक सचिन नरवडे, इंजि. प्रवीण फलके यांचा स्तुत्य पुढाकार; युवा फाऊंडेशनच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर कुटुंबांना दिवाळी किटचे वाटप


मॅक्स उद्योग समूहाचा ६०० गरजू कुटुंबांना मदतीचा हात

पारनेर / ता. प्रतिनिधी, 

ढवळपुरी ता. पारनेर दिवाळी म्हणजे आनंदाचा, प्रकाशाचा आणि आपुलकीचा सण! मात्र, यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक शेतकरी आणि शेतमजूर कुटुंबांसमोर सण साजरा करण्याचेही मोठे आव्हान उभे राहिले आहे. अशा कठीण परिस्थितीत समाजातील गरजू कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचे काम मॅक्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा सचिन नरवडे व युवा उद्योजक इंजि. प्रवीण फलके यांनी केले आहे. त्यांच्या पुढाकारातून युवा फाऊंडेशन ढवळपुरी यांच्या सहकार्याने गावातील तब्बल ६०० गरजू, दुष्काळग्रस्त शेतकरी व शेतमजूर कुटुंबांना दिवाळी किटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचे दर्शन घडले.

दिवाळीच्या सणाला प्रत्येक घरात आनंदाचा दिवा लागावा, प्रत्येक कुटुंबाच्या चेहऱ्यावर समाधान दिसावे आणि आर्थिक अडचणींमुळे कोणाचेही सणाचे आनंदाचे क्षण हिरावले जाऊ नयेत, या उदात्त हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विशेषतः दुष्काळामुळे शेती व्यवसाय अडचणीत आला असून शेतकरी आणि शेतमजूर कुटुंबांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत त्यांना दिवाळीच्या काळात मदतीचा हात देत ६०० कुटुंबांपर्यंत दिवाळी किट पोहोचविण्यात आले.

या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ किट वाटप करून सामाजिक जबाबदारी पूर्ण न करता, प्रत्येक गरजू कुटुंबापर्यंत मदत पोहोचावी यासाठी विशेष नियोजन करण्यात आले होते. लाभार्थी कुटुंबांची माहिती संकलित करणे, गावातील दुर्गम भागांत घरोघरी जाऊन कूपन वाटप करणे, किट वितरणाची व्यवस्था करणे आणि प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत मदत पोहोचविणे, अशा विविध जबाबदाऱ्या युवा फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी पार पाडल्या. सर्वांच्या एकजुटीने आणि नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे हा उपक्रम यशस्वी झाला.

या कार्यक्रमाला मॅक्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा सचिन नरवडे, युवा उद्योजक इंजि. प्रवीण फलके, उपसरपंच बबन पवार, अमोल ठाणगे, होणाभाऊ घोगरे, ग्रामपंचायत सदस्य संतोष गोयकर, माजी ग्रामपंचायत सदस्य देविदास फलके, बबन राठोड, नंदू गावडे, इंजि. वसंत चितळकर, नंदू वाघ, संतोष थोरात, विश्वनाथ वाघ, गणेश पारखे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाजीशेठ चौधरी, दादाभाऊ व्यवहारे, आसिफ शेख, धनराज चौधरी, गणेश ठोकळ, गोटीराम पवार, भानुदास मोरे, विजय सांगळे, दिनेश चौधरी, बाळशीराम ठोकळ, संपत व्यवहारे, आरिफ शेख, संभाजी नवले, महेश ठोकळ, अभिमन्यू चौधरी, दयाराम चौगुले, केशव वाव्हळ आणि फिरोज शेख आदी उपस्थित होते.

या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी बबन काका राठोड, संदीप चव्हाण, कृष्णा आव्हाड, प्रवीण परशुराम जाधव, प्रवीण कनीराम जाधव, रवी पवार, चिमाजी भले, राजू पथवे, संतोष गोयकर, तुषार चौगुले, अबू दरेकर, प्रवीण भनगडे, लहू भनगडे, वैभव खांडके आणि संदीप वाव्हळ यांनी विशेष परिश्रम घेतले.
 मदतीच्या हातातून माणुसकीचा प्रकाश!
आजच्या काळात अनेकजण स्वतःच्या प्रगतीचा विचार करतात; मात्र समाजातील गरजू घटकांच्या अडचणी ओळखून त्यांच्या सणात आनंद निर्माण करण्यासाठी पुढाकार घेणारे हात समाजासाठी प्रेरणादायी ठरतात. 

🔶🔶🔶🔶🔶🔶
 समाजातील गरजू, कष्टकरी आणि वंचित घटकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, हीच खरी सामाजिक बांधिलकी आहे. सचिन नरवडे आणि इंजि. प्रवीण फलके यांनी ६०० कुटुंबांना दिवाळी किट देऊन केवळ वस्तूंचे वाटप केले नाही, तर त्यांच्या घरात आनंदाचा दिवा पेटविण्याचा प्रयत्न केला आहे. युवा फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग घेत सामाजिक एकोपा आणि सेवाभावाचा आदर्श निर्माण केला. दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या कुटुंबांच्या दिवाळीत आनंदाचा प्रकाश पसरविणारा हा उपक्रम ढवळपुरी परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.

– देविदास फलके, माजी चेअरमन ढवळपुरी
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments