पारनेर / ता. प्रतिनिधी,
पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागाच्या विकासाला प्राधान्य देत सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले आमदार काशिनाथ दाते सर यांच्या पाठपुराव्याला आणखी एक महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. पारनेर तालुक्यातील सहा ठिकाणी सुसज्ज एसटी बसथांबे उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली असून, प्रत्येकी २० लाख रुपये याप्रमाणे एकूण १ कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अहिल्यानगर विभागातील विविध ठिकाणी प्रवासी मार्ग निवारे उभारण्यासाठी एकूण १५ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये पारनेर तालुक्यातील अळकुटी, निघोज, नारायण गव्हाण, देवीभोयरे, एमआयडीसी फाटा सुपा आणि पाडळी रांजणगाव या सहा ठिकाणांचा समावेश आहे. प्रत्येक बसथांब्यासाठी २० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, वीज आणि सार्वजनिक वाहतूक अशा मूलभूत प्रश्नांवर संबंधित विभागांशी समन्वय साधून सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. नागरिकांची एखादी छोटीशी गैरसोयदेखील दूर व्हावी, जीवनमानात सकारात्मक बदल घडावा आणि ग्रामीण भागातील सुविधांचा दर्जा उंचावावा,
लोकप्रतिनिधित्व म्हणजे केवळ जनतेच्या समस्या ऐकणे नव्हे, तर त्या समस्या सोडविण्यासाठी शासनदरबारी प्रभावीपणे आवाज उठवून प्रत्यक्ष निर्णयापर्यंत पोहोचणे होय. सहा बसथांब्यांसाठी निधी मंजूर केल्याबद्दल परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांचे खुप खुप धन्यवाद
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
ग्रामीण भागातील विद्यार्थी, महिला, शेतकरी, शेतमजूर, नोकरदार आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणावर एसटी बससेवेचा वापर करतात. मात्र, अनेक ठिकाणी बसची प्रतीक्षा करताना प्रवाशांना उन्हात, पावसात उभे राहावे लागते. विशेषतः महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांची यामुळे मोठी गैरसोय होते. ही बाब लक्षात घेऊन प्रवाशांच्या मूलभूत सुविधेचा प्रश्न प्राधान्याने हाती घेतला. संबंधित बसथांब्यांच्या मंजुरीसाठी सातत्याने पाठपुरावा करून शासनस्तरावर हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले.
– आ. काशिनाथ दाते सर
(विधानसभा सदस्य)



