Friday, November 27, 2026
Google search engine
Homeपारनेर"करंदीत विकासाची नवी पहाट; पाणीपुरवठा व स्ट्रीट लाईट कामांचा सुजित झावरे पाटील...

“करंदीत विकासाची नवी पहाट; पाणीपुरवठा व स्ट्रीट लाईट कामांचा सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते शुभारंभ!”



करंदी (प्रतिनिधी):
करंदी गावाच्या विकासाला नवी गती देणाऱ्या महत्त्वपूर्ण कामांचा भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला. गावातील पाणी पुरवठा योजनेसाठी नवीन विद्युत रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) बसविणे तसेच स्ट्रीट लाईट उभारणीच्या कामांचा शुभारंभ सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला. या कामांमुळे करंदीच्या विकासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार पडल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.


गावातील पाणीपुरवठा योजनेला सातत्यपूर्ण वीज मिळावी, यासाठी स्वतंत्र विद्युत रोहित्राची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. त्याचबरोबर रात्रीच्या वेळी गावातील रस्त्यांवर पुरेसा प्रकाश नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. या दोन्ही मूलभूत प्रश्नांची दखल घेत सुजित झावरे पाटील यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे कामांना मंजुरी मिळाली असून आता प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे.


🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
यावेळी बोलताना सुजित झावरे पाटील म्हणाले, “ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय आहे. पाणीपुरवठा योजनेसाठी स्वतंत्र रोहित्र उपलब्ध झाल्याने पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागेल. तसेच स्ट्रीट लाईटमुळे गावातील सुरक्षितता वाढण्याबरोबरच गाव अधिक प्रकाशमान आणि सुशोभित होईल.”


या भूमिपूजन सोहळ्याला ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, विविध संस्थांचे प्रतिनिधी, मान्यवर आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. विकासकामांना प्रत्यक्ष सुरुवात झाल्याने करंदीकरांमध्ये समाधानाचे वातावरण असून, सुजित झावरे पाटील यांच्या प्रयत्नांचे ग्रामस्थांनी कौतुक करत आभार व्यक्त केले.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments