Wednesday, November 25, 2026
Google search engine
Homeपारनेरकेडगाव अवैध गॅस रिफिलिंगची चौकशी करून दोषींवर कारवाई करा : आमदार काशिनाथ...

केडगाव अवैध गॅस रिफिलिंगची चौकशी करून दोषींवर कारवाई करा : आमदार काशिनाथ दाते


आ दातेंची विधानसभेत मागणी!

पारनेर / ता. प्रतिनिधी  

अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न क्रमांक २३२२१ अंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील केडगाव बायपास परिसरात उघडकीस आलेल्या अवैध एलपीजी गॅस रिफिलिंग प्रकरणावर पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांनी विधानसभेत आवाज उठवत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली.
    
आमदार दाते म्हणाले केडगाव बायपासलगत अनुराग टायरच्या गोदामामध्ये चाकणवरून अहिल्यानगर, संभाजीनगरला गॅस वाहतूक करणाऱ्या गॅस टँकरमधून अनधिकृतपणे एलपीजी गॅस रिफिलिंग केले जात होते. हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू असल्याचे समोर आले असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकाऱ्यांच्या कारवाईदरम्यान रात्री उशिरा छापा टाकून रंगेहाथ चार आरोपींना अटक करण्यात आली, तर दोन आरोपी फरार असल्याचे निदर्शनास आले. मात्र अटक झालेल्या आरोपींना जामीन मिळाल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली.

या पार्श्वभूमीवर आमदार दाते यांनी सरकारला थेट प्रश्न विचारत, “अटक केलेल्या आरोपींना मिळालेला जामीन रद्द करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार का?” असा सवाल उपस्थित केला. तसेच, हा अवैध प्रकार संबंधित कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सातत्याने सुरू असताना स्थानिक पोलिसांची जबाबदारी निश्चित करून त्यांची चौकशी करण्यात येणार का आणि दोषी आढळल्यास संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जाणार का, असेही त्यांनी स्पष्टपणे विचारले.

यावेळी राज्य शासनाच्या वतीने उत्तर देताना सांगण्यात आले की, पोलिसांनीच या प्रकरणाचा छडा लावून कारवाई केली असून संबंधित ठिकाणी छापे टाकून आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच, इंधन चोरी सारख्या प्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्हास्तरावर विशेष पथके तयार करण्यात आली असून अवैध गॅस व इंधन व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सातत्याने कारवाई सुरू आहे. संबंधित कायद्यांनुसार पुढील कठोर कारवाई करण्याबाबतही विचार सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मात्र पोलिसांचा थेट सबंध आहे किंवा काय याचा शोध घेतला जाईल.

आमदार काशिनाथ दाते यांनी या चर्चेतून अवैध गॅस रिफिलिंगसारख्या धोकादायक प्रकारांवर कठोर नियंत्रण ठेवण्याची गरज अधोरेखित करत, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने अधिक दक्ष राहावे, अशी ठाम भूमिका मांडली.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments