Thursday, November 26, 2026
Google search engine
Homeटाकळी ढोकेश्वरग्रामीण भागातील गुणवत्तेला योग्य जिद्दीची जोड मिळाल्यास अशक्य काहीच नाही – ज्येष्ठ...

ग्रामीण भागातील गुणवत्तेला योग्य जिद्दीची जोड मिळाल्यास अशक्य काहीच नाही – ज्येष्ठ नेते शिवाजीराव ठाणगे


अभिनव खराबी याचे ‘जेईई ॲडव्हान्स’ परीक्षेत देदीप्यमान यश; टाकळी ढोकेश्वर पंचक्रोशीतून कौतुकाचा वर्षाव

पारनेर/प्रतिनिधी : 
ग्रामीण भागात बुद्धिमत्तेची कमतरता नाही, गरज आहे ती फक्त योग्य ध्येयाची आणि जिद्दीची. आजच्या स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी पारंपरिक चौकटीबाहेर पडून उच्च व तांत्रिक शिक्षण घेण्याची अत्यंत गरज आहे. अभिनव खराबी याने देशातील अत्यंत कठीण अशा ‘जेईई ॲडव्हान्स’ परीक्षेत मिळवलेले यश हे आपल्या संपूर्ण परिसरासाठी दीपस्तंभासारखे आहे. 
असे मत ज्येष्ठ नेते माजी चेअरमन शिवाजी ठाणगे यांनी व्यक्त केले.

देशातील अत्यंत कठीण आणि प्रतिष्ठेची मानली जाणाऱ्या ‘जेईई ॲडव्हान्स’ (JEE Advanced) परीक्षेत टाकळी ढोकेश्वर येथील उद्योजक अशोक खराबी यांचे सुपुत्र कु. अभिनव अशोक खराबी याने नेत्रदीपक यश संपादन केले आहे. अभिनवने या परीक्षेत देशात ५३०७ वा रँक, तर ओबीसी (OBC) प्रवर्गात ११६२ वा रँक मिळवून तालुक्याच्या वैभवात मोलाची भर घातली आहे. या दैदिप्यमान यशाबद्दल टाकळी ढोकेश्वर येथे त्याचा सत्कार ज्येष्ठ नेते माजी चेअरमन शिवाजी ठाणगे व सेवानिवृत्त कृषी अधिकारी सोन्याबापू बर्वे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला होता.

यावेळी पुढे बोलताना ज्येष्ठ नेते शिवाजी ठाणगे म्हणाले
कोठ्यासारख्या ठिकाणी प्रतिकूल परिस्थितीतही त्याने मिळवलेला रँक कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्याने अभिनवच्या या यशाचा आदर्श आणि प्रेरणा डोळ्यांसमोर ठेवून कठोर परिश्रम घेतले पाहिजेत. अपयशाची भीती न बाळगता जिद्दीने अभ्यास केल्यास ग्रामीण भागातील मुलेही जागतिक पातळीवर चमकू शकतात, हा विश्वास अभिनवने दाखवून दिला आहे.

कु. अभिनव खराबीचा सत्कार करण्यात आला यावेळी सेवानिवृत्त कृषी अधिकारी सोन्याबापू बर्वे साहेब, ज्येष्ठ नेते तसेच माजी चेअरमन शिवाजीराव ठाणगे, यांच्यासह माजी सरपंच सुभाष ठाणगे, शिक्षक नेते संतोष खामकर, राष्ट्रवादीचे प्रवक्ते मोहनराव रोकडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अरुणराव ठाणगे, पळशी गावचे सरपंच प्रकाश राठोड, माऊली पतसंस्थेचे चेअरमन महादू भालेकर, उद्योजक संदीप खराबी, उद्योजक भाऊ रांधवण, पवन झावरे, माऊली खराबी, निवृत्ती बर्वे, जिजाबापू नरड, अशोक निमसे, सर्जेराव साळुंके, पत्रकार गणेश जगदाळे, युवा उद्योजक साई खराबी तसेच यावेळी टाकळी ढोकेश्वर परिसरातील अशोक खराबी यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments