Thursday, November 26, 2026
Google search engine
Homeपारनेर"ग्रामीण भागातील मुलींचे यश प्रेरणादायी" – आमदार काशिनाथ दाते सर

“ग्रामीण भागातील मुलींचे यश प्रेरणादायी” – आमदार काशिनाथ दाते सर

मुंबई पोलीस दलात निवड झाल्याबद्दल वडगाव सावताळच्या कन्यांचा गौरव

पारनेर / ता . प्रतिनिधी,  

पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ येथील काजल मच्छिंद्र खामकर व सुप्रिया अशोक आंधळे यांची मुंबई पोलीस खात्यात कॉन्स्टेबल पदावर नियुक्ती झाल्याबद्दल पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. काशिनाथ दाते सर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून गौरव करण्यात आला.


या सत्कार समारंभास जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वसंतराव चेडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोकराव सावंत, तालुकाध्यक्ष विक्रमसिंह कळमकर, आर. एस. कापसे सर, देवराम शेठ मगर, सुभाषराव सासवडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका महिला अध्यक्षा सुषमाताई रावडे, भाऊसाहेब खामकर सर, दत्तात्रय सरोदे, प्रदीप रोकडे, माजी सरपंच बाबासाहेब शिंदे, कैलास खामकर, मंगेश खामकर, तुषार खामकर, विठ्ठल खामकर, शैलेश जांभळकर, शुभम आंधळे, विठ्ठल बर्डे, अमोल शिंदे, आप्पा गायकवाड, जयवंत खामकर, विश्वनाथ गोरडे, शुभम चौधरी, दिपक खामकर, मच्छिंद्र खामकर, इरफान शेख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व तालुक्यातील विविध गावांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सत्कारानंतर उपस्थित मान्यवरांनी दोन्ही युवतींचे अभिनंदन करत त्यांच्या भावी सेवेसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला. ग्रामीण भागातील मुलींनी कठोर परिश्रम, चिकाटी आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा यांच्या बळावर मिळविलेले हे यश निश्चितच नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


🔶🔶🔶🔶🔶🔶
🔸 ग्रामीण भागातील मुली जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर आज विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करत आहेत. काजल खामकर आणि सुप्रिया आंधळे यांची मुंबई पोलीस दलात झालेली निवड ही केवळ त्यांच्या कुटुंबासाठी नव्हे तर संपूर्ण पारनेर तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या यशामुळे ग्रामीण भागातील इतर विद्यार्थिनींनाही मोठी प्रेरणा मिळणार असून त्यांनी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत समाजसेवेचा आदर्श निर्माण करावा,

– आ. काशिनाथ दाते सर 
(विधानसभा सदस्य)
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments