Friday, November 27, 2026
Google search engine
Homeपारनेरजादूचे प्रयोग मनोरंजनातून शिक्षणाकडे जाण्याचा अप्रतिम मार्ग - नगरसेवक युवराज पठारे

जादूचे प्रयोग मनोरंजनातून शिक्षणाकडे जाण्याचा अप्रतिम मार्ग – नगरसेवक युवराज पठारे

पारनेर/ प्रतिनिधी, 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कण्हेर ओहळ येथे पालक संवाद मेळावाचे औचित्य साधत जादूचे प्रयोग या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उदघाटन पारनेर नगरपंचायतचे नगरसेवक श्री. युवराज पठारे व सौ. मनीषा युवराज पठारे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. गणेश भिसे प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी नगरसेवक श्री. युवराज पठारे यांनी “जादूचे प्रयोग या कार्यक्रमाच्या माध्यमातून मनोरंजनासोबत विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण होईल” असा आशावाद व्यक्त केला. सौ. मनीषा युवराज पठारे यांनी शाळांसाठी विविध कलागुणांना वाव देणारे उपक्रम आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

जादूगार प्रकाश शिरोळे यांनी जादूचे प्रयोग दाखवत विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले. विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. काही प्रयोग करून दाखवत जादू हा विज्ञान व हातचलाखी चा खेळ आहे हे सिद्ध करून दाखवले.

शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शगुफा शेख यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच विविध उपक्रम राबविण्याचा प्रयत्न भविष्यातही कायम राहील असा मानस व्यक्त केला. कार्यक्रमाचे संयोजक, चित्रपट गीतकार श्री. अरुण वाळुंज यांनी जादूचे प्रयोग हा कार्यक्रम तालुक्यातील खेड्यापाड्यातील सर्वच शाळांमध्ये आयोजित केला जाईल असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रम प्रसंगी सहशिक्षिका श्रीमती सुवर्णा खेडेकर, अंगणवाडी सेविका सौ.सुनंदा मगर, मदतनीस सौ. वैशाली सोबले व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments