Thursday, November 26, 2026
Google search engine
Homeपारनेरटाकळी ढोकेश्वर येथे गुरुवारी शिष्यगण मेळाव्याचे आयोजन

टाकळी ढोकेश्वर येथे गुरुवारी शिष्यगण मेळाव्याचे आयोजन

टाकळी ढोकेश्वर – प्रतिनिधी, 
पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे गुरुवार दिनांक १० जुलै २०२५ रोजी श्री. रामदास भाऊसाहेब बांडे शिष्य मंडळ आयोजित गुरुपौर्णिमा उत्सव २०२५ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यासाठी लोकनेते खासदार मा.निलेशजी लंके,
आमदार मा. काशिनाथ दाते सर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मा. सुजितराव झावरे पा., जिल्हा मराठा प्रसारक समाज संस्थेचे जेष्ठ विश्वस्त श्री. सिताराम खिलारी सर, श्री. अशोकशेत कटारिया
यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपूर्ण होणार आहे.

या शिष्यगण मेळाव्यासाठी गुरुवार दि.१०/०७/२०२४
सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत ह.भ.प. गोरक्षनाथ महाराज रोकडे (वडगाव सावताळ) यांचे सुश्राव्य प्रवचन होईल सकाळी ११ वाजता सर्व गरजवंतांना वस्त्र वाटप होणार असून सकाळी ११ ते ५ वा. या वेळेमध्ये श्री अशोक गंगाराम चव्हाण, श्री. महेश धोडीराम सर्वश, श्री. महेश रामदास बांडे यांच्यातर्फे महाप्रसादाचे आयोजनही या ठिकाणी करण्यात आले आहे तरी या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन टाकळी ढोकेश्वर
सरपंच, उपसरपंच, चेअरमन व्हा. चेअरमन, सर्व पत्रकार बांधव, भैरवनाथ मित्र मंडळ, बनाई मित्र मंडळ, नवभारत मित्र मंडळ, समस्त ग्रामस्थ टाकळी ढोकेश्वर व सर्व शिष्यगण परिवार यांच्यावतीने करण्यात आले आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments