Thursday, November 26, 2026
Google search engine
Homeअहिल्यानगरदिव्यांग बांधवांचा प्रश्न मार्गी; रविंद्र राजदेव यांच्या पुढाकाराने मिळाला दिलासा

दिव्यांग बांधवांचा प्रश्न मार्गी; रविंद्र राजदेव यांच्या पुढाकाराने मिळाला दिलासा



अहिल्यानगर : येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अनेक दिव्यांग बांधवांचे अपंग प्रमाणपत्र ऑनलाइन न झाल्यामुळे त्यांचा संजय गांधी योजनेअंतर्गत मिळणारा मानधनाचा पगार बंद झाल्याची गंभीर समस्या निर्माण झाली होती. यामुळे अनेक दिव्यांग बांधवांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब समजताच टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटाचे गटनेते श्री. रविंद्र राजदेव यांनी तातडीने पुढाकार घेत संबंधित दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हजर राहून प्रशासनाशी समन्वय साधला.

श्री. राजदेव यांनी गटातील तसेच गटाबाहेरील दिव्यांग बांधवांची कागदपत्रे तपासून घेणे, ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करून घेणे तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या या तत्परतेमुळे अनेक दिव्यांग बांधवांची प्रलंबित कामे पूर्ण झाली असून बंद झालेला संजय गांधी योजनेचा लाभ पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अनेक दिवसांपासून शासकीय प्रक्रियेमुळे त्रस्त असलेल्या दिव्यांग बांधवांना मोठा दिलासा मिळाल्याने त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. यावेळी उपस्थित दिव्यांग बांधवांनी टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटाच्या नेत्या सौ. सोनियाताई रविंद्र राजदेव तसेच गटनेते श्री. रविंद्र राजदेव यांचे मनापासून आभार मानले व त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

या प्रसंगी पोपट गुंड, माजी सरपंच भानुदास आग्रे, तसेच नागरिक उपस्थित होते.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments