Thursday, November 26, 2026
Google search engine
Homeपारनेरनांदूर पठारात बैलपोळा उत्साहात; शेतकऱ्यांचा सत्कार ; रवींद्र राजदेव यांचा उपक्रम

नांदूर पठारात बैलपोळा उत्साहात; शेतकऱ्यांचा सत्कार ; रवींद्र राजदेव यांचा उपक्रम


पारनेर / प्रतिनिधी, 
यंदा समाधानकारक पाऊस, वाढलेले दूध आणि कांद्याचे भाव तसेच जोमात असलेले सोयाबीन पीक यामुळे नांदूर पठारातील शेतकरी आनंदी आणि समाधानी आहे. या आनंदात आणखी भर टाकण्यासाठी नांदूर पठारचे सरपंच आणि निलेश लंके प्रतिष्ठानचे तालुका उपाध्यक्ष रविंद्रशेठ राजदेव यांच्या पुढाकाराने रविंद्रशेठ राजदेव मित्रमंडळातर्फे बैलपोळा उत्सवात गावातील सर्व बैलमालक, बैलगाडा मालक आणि ट्रॅक्टर मालकांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात शेतकऱ्यांना फेटा बांधून त्यांचा गौरव करण्यात आला, ज्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
सोहळ्याला गावचे सरपंच भानुदास आग्रे, माजी सरपंच जयराम दादा चौधरी, लक्ष्मण देशमाने, राजारामशेठ राजदेव, उद्योजक विलासशेठ घोलप, नवनाथ पाटील घोलप, सखाराम आग्रे, विठ्ठल आग्रे, विठ्ठल गाडेकर, भाऊसाहेब चौधरी, अमोल गाडगे, संदेश आग्रे, रामदास, राजेंद्र राजदेव, अमोल चौधरी, बाबाजी चौधरी, उत्तम आग्रे, महिपती आग्रे, रामभाऊ आहेर, सीताराम भांबरे, संतोष पानसरे, बाळू पानसरे, रंगुआजा चौधरी, बाळू आग्रे, दिनेश राजदेव, दीपक देशमाने, कचर गाढवे, विष्णू गाढवे, हरी घोलप, नवनाथ राजदेव, भानुदास चौधरी, योगेश राजदेव, स्वामी राजदेव यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचा उत्साह द्विगुणित झाला. रविंद्रशेठ राजदेव यांनी शेतकऱ्यांच्या मेहनतीला आणि परंपरेला सन्मान देण्यासाठी हा उपक्रम राबवला. ग्रामस्थांनी या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले आणि शेतकऱ्यांच्या सन्मानाने गावात एकता आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. बैलपोळा हा सण शेतकऱ्यांच्या जीवनातील मेहनत आणि समृद्धीचे प्रतीक आहे, आणि यंदा हा सण नांदूर पठारात विशेष उत्साहात साजरा झाला.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments