सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते लाभार्थी शेतकऱ्यांना साहित्य वितरण
पारनेर | प्रतिनिधी,
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, शेती अधिक सक्षम व आधुनिक व्हावी तसेच पाणलोट क्षेत्रातील शेती विकासाला चालना मिळावी, या उद्देशाने नाबार्ड अर्थसहाय्यित पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत गावातील शेतकऱ्यांना शेती उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. शिवसेना नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते लाभार्थी शेतकऱ्यांना या साहित्याचे वितरण करण्यात आले.
शेती क्षेत्राच्या विकासासाठी पाण्याचे योग्य नियोजन, मृद व जलसंधारण तसेच आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब करणे काळाची गरज आहे. पाणलोट विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवश्यक शेती साहित्य उपलब्ध करून दिल्याने त्यांच्या शेतीकामाला निश्चितच मदत होणार आहे. अशा योजनांचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे यावेळी सुजित झावरे पाटील यांनी सांगितले.
यावेळी चेअरमन पी. डी. बर्वे, भाऊसाहेब सैद, शरदकाका पाटील, बाळासाहेब झावरे, नारायण झावरे, लहानभाऊ झावरे, बबन तळेकर गुरुजी, शांताराम झावरे, मधुकर भालेकर, शरद सैद, संतोष भालेकर, खंडू टोपले, सावित्रा टोपले, शिवराम सैद, विठ्ठल सैद, बाळासाहेब वाबळे यांच्यासह मान्यवर मंडळी व मोठ्या संख्येने लाभार्थी शेतकरी उपस्थित होते.
या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, पाणलोट विकासाच्या माध्यमातून शेती समृद्ध करण्याच्या प्रयत्नांना बळ मिळणार आहे.



