Friday, November 27, 2026
Google search engine
Homeपारनेरनारायणगव्हाणच्या चुंबळेश्वर देवस्थानला नवी ओळख : ४० लाखांच्या कीर्तन मंडपाचे भूमिपूजन उत्साहात...

नारायणगव्हाणच्या चुंबळेश्वर देवस्थानला नवी ओळख : ४० लाखांच्या कीर्तन मंडपाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न


पारनेर / ता. प्रतिनिधी, 

नारायणगव्हाण येथील श्री क्षेत्र चुंबळेश्वर महादेव मंदिर परिसराच्या सर्वांगीण विकासाला गती देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आज पार पडला. पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून पर्यटन विकास निधीतून मंजूर झालेल्या सुमारे ४० लाख रुपये खर्चाच्या भव्य कीर्तन मंडप बांधकामाचे भूमिपूजन विधीवत संपन्न झाले.

या मंडपामुळे मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रम, कीर्तन- भजन, प्रवचन यांसाठी सुयोग्य व सुसज्ज व्यवस्था निर्माण होणार असून, भाविकांना अधिक सोयीस्कर आणि व्यवस्थित सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे या ठिकाणच्या धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना नवे बळ मिळणार आहे.

यावेळी आमदार काशिनाथ दाते सर म्हणाले “आपल्या तालुक्यातील देवस्थानांचा विकास हा केवळ श्रद्धेचा भाग नसून, तो ग्रामीण भागाच्या प्रगतीशी थेट जोडलेला आहे. चुंबळेश्वर मंदिरासारख्या ठिकाणांचा विकास केल्यास येथे येणाऱ्या भाविकांची संख्या वाढेल, स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि गावाच्या आर्थिक व सामाजिक विकासाला चालना मिळेल. पर्यटन विकासाच्या माध्यमातून आपल्या भागातील परंपरा आणि संस्कृती जतन करत विकास साधण्याचा आमचा प्रयत्न कायम राहील.”

या प्रसंगी सुनील थोरात, बाळासो कळमकर, सुरेश बोरुडे सर, संतोष गायकवाड, खिवंसरा काका, सहादू शेळके, बंडोपंत नाईक, तारा दरेकर, संजय शेळके, दादासाहेब शेळके, विकास पवार, हुसेन शेख, गणेश शेळके, हेमंत कांडेकर, सौ. मनीषा जाधव, सविता भोसले, श्रीमती अनुसया कांडेकर, अण्णा चव्हाण, बाळासाहेब चव्हाण, भरत भोसले, मेजर काशिनाथ नवले, प्रताप अंबुले, सौ. उषा संजय शेळके, सौ. कामिना विकास पवार आदी मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भूमिपूजन सोहळ्यामुळे नारायणगव्हाण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, या कामामुळे चुंबळेश्वर मंदिर परिसर अधिक आकर्षक व सुविधायुक्त होणार असल्याने भाविकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.

🔶🔶🔶🔶🔶🔶
 “आमदार काशिनाथ दाते सरांनी नारायणगव्हाणसारख्या ग्रामीण भागातील देवस्थानाच्या विकासासाठी घेतलेली पुढाकार खरोखर कौतुकास्पद आहे. चुंबळेश्वर मंदिरासाठी कीर्तन मंडप उभारणीमुळे भाविकांना मोठी सुविधा मिळणार आहे. सरांनी केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कामातून विकास घडवून आणला आहे, याचे समाधान वाटते. त्यांच्या या कामामुळे गावाच्या धार्मिक व पर्यटनदृष्ट्या प्रगतीला नक्कीच चालना मिळेल. पुढील काळातही अशाच पद्धतीने विकासकामे सुरू राहतील, असा विश्वास आहे.”

– सुरेश बोरुडे सर, माजी सरपंच नारायणगव्हाण
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments