Thursday, November 26, 2026
Google search engine
Homeपारनेरनितीन आहेर यांची शिवसेना (उबाठा) पारनेर उपतालुकाप्रमुखपदी निवड

नितीन आहेर यांची शिवसेना (उबाठा) पारनेर उपतालुकाप्रमुखपदी निवड


पारनेर/प्रतिनिधी : 
नांदूर पठार गावचे युवा नेतृत्व नितीन आहेर यांची शिवसेना (उबाठा) पारनेर उपतालुकाप्रमुखपदी निवड झाली आहे. शिवसेना पारनेर तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे यांनी त्यांना निवडीचे पत्र सुपूर्द केले. ग्रामीण भागातील या तरुण नेत्याने आपल्या कार्यकुशलतेने आणि पक्षनिष्ठेने सर्वांचे लक्ष वेधले आहे.नितीन आहेर यांनी नांदूर पठार शाखाप्रमुख म्हणून पक्षाच्या कार्याची सुरुवात केली. तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संपर्क साधत त्यांनी पक्षाच्या विचारधारेला गावागावांत पोहोचवले. सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवताना त्यांनी गावातील तरुणांना एकत्र आणून पक्ष संघटन मजबूत केले. त्यांच्या या योगदानाची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर उपतालुकाप्रमुखपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.निवडीबद्दल बोलताना नितीन आहेर म्हणाले, “शिवसेनेच्या विचारधारेने प्रेरित होऊन मी गावापासून काम सुरू केले. ही निवड माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्त्याला बरोबर घेऊन पक्षाचे कार्य अधिक बळकट करेन ग्रामीण भागातून येऊन पक्षाच्या कार्याला गती देणाऱ्या नितीन आहेर यांच्या या यशामुळे गावात आनंदाचे वातावरण आहे. कार्यकर्त्यांनी आणि गावकऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. ही निवड पारनेर तालुक्यातील शिवसेना (उबाठा) पक्षाला नवे बळ देणारी ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments