निमगाव भोगी / स्वप्निल भालेराव,
आयटीसी मिशन सुनहरा कल व बायफ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १३ ऑगस्ट २०२५ रोजी निमगाव भोगी येथे जैवविविधता संवर्धन कार्यक्रम अंतर्गत वृक्षारोपणाचा हरित सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री महबूब सय्यद (समन्वयक, सह्याद्री देवराई, पुणे) होते. प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री चंद्रकांत वरखडे (बकोरी देवराई प्रकल्प, वृक्षमित्र पुरस्कार २०२५), माननीय सौ. ज्योतीताई लक्ष्मण सांबरे (सरपंच, निमगाव भोगी), सौ. उषाताई वाखारे (वात्सल्य सिंधू फाउंडेशन), माननीय श्री संतोष सांबरे (हीलिंग लाईव्ह, महाराष्ट्र प्रदेश प्रमुख), श्री गणेश शेवाळे (विभागीय कार्यक्रम अधिकारी, बायफ शिरूर), श्री विनीत गायकवाड (बायफ शिरूर) तसेच विविध वन समित्या, ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
सहभागी संस्थांमध्ये सिद्धेश्वर वनीकरण समिती शिरूर, वृक्षवल्ली मल्टीपर्पज फाउंडेशन कोहकडी, राजे शिवशाही समूह यांचा समावेश होता. तसेच डॉक्टर निकिता तळेकर, बायफ कृषी सहाय्यक सौ. ज्योती भिटे, श्री ऋषिकेश चौधरी, श्री गजानन पाटील, श्री किरण सालके आदी मान्यवर उपस्थित राहिले.
मान्यवरांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत “झाडे लावा, झाडे जगवा” व “आज झाड लावा, उद्या मिळेल सावली” असा संदेश दिला. या उपक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात आली.
विशेष म्हणजे, मराठी अभिनेते व वृक्षप्रेमी मा. सयाजी शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे हजेरी लावून कार्यक्रमाचे कौतुक केले. त्यांनी बायफ व आयटीसी संस्थांचे आभार मानले तसेच भविष्यात निमगाव भोगीला भेट देऊन अशा उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.
कार्यक्रमाचा समारोप वृक्ष वाचवा प्रतिज्ञेने झाला. आभार प्रदर्शन श्री गणेश शेवाळे (विभागीय अधिकारी, बायफ) यांनी केले.




