Wednesday, November 25, 2026
Google search engine
Homeपारनेरपत्रकार सौ.निलम खोसे पाटील , प्राचार्य लंके व लोणकर राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित;...

पत्रकार सौ.निलम खोसे पाटील , प्राचार्य लंके व लोणकर राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित; राष्ट्रीय लोकराज्य मीडिया समूहाचे राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान


पारनेर – पारनेर तालुक्यातील महिला पत्रकार सौ. निलम खोसे पाटील, प्राचार्य जयसिंग लंके व सामाजिक कार्यकर्ते सुनिल लोणकर यांना राष्ट्रीय लोकराज्य मीडिया समूहाच्या वतीने नुकतेच राज्यस्तरीय पुरस्कार देत सन्मानित केले आहे.

     श्रीराम नवमी च्या शुभ मुहूर्तावर अष्टविनायक देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या थेऊर येथे राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाच्या वतीने प्रत्येकवर्षी राज्यातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

      पारनेर तालुक्यातील निघोज येथील महिला पत्रकार व दैनिक पारनेर समर्थ च्या कार्यकारी संपादक, दैनिक जनता आवाज च्या तालुका प्रतिनिधी म्हणून पत्रकारिता क्षेत्रात आपल्या लेखनी व्दारे ठसा उमटविणाऱ्या सौ. निलम खोसे पाटील यांच्या कामगिरी ची दखल घेत त्यांना ” राज्यस्तरीय आदर्श महिला पत्रकार पुरस्कार ” देऊन गौरविण्यात आले.

     तर वडझिरे येथील पवन पुत्र शिक्षण संस्थेचे सचिव व वडझिरे इंग्रजी माध्यमाच्या शाळे चे प्राचार्य जयसिंग लंके यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उत्तुंग कार्या बद्दल त्यांचा ” राज्यस्तरीय शैक्षणिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार ” देऊन गौरव करण्यात आला.

    पारनेर तालुक्यातील कृषी , सामाजिक व क्षेत्रातील अनेक प्रश्न समजावून घेत , त्यावर वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करून ते प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अहोरात्र झटणारे लोणी मावळा येथील सामाजिक कार्यकर्ते सुनिल लोणकर यांच्या कार्याची दखल घेत त्यांना ही ” राज्यस्तरीय आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार ” देत सन्मानित करण्यात आले.

    यावेळी भूमाता ब्रिगेड च्या अध्यक्षा तृप्ती देसाई, खंडोबा फेम कलाकार ॲड . महेश देवकाते यांच्या हस्ते, अभिनेत्री भारती जिपकाटे, रिया खुरपुडे, भक्ती परदेशी, अभिनेता गोपाल वानखडे, मंगेश खरात व मीडिया समुहाचे संपादक राहुल खुदनर, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश खोसे पाटील व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत गौरव मुर्तींना फेटा बांधून, पदक घालत, सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आला.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments