Thursday, November 26, 2026
Google search engine
Homeपारनेरपारनेरच्या रस्ते विकासाला केंद्राची मंजुरी, १० कोटींच्या विकासकामांचा मार्ग मोकळा; आमदार दाते...

पारनेरच्या रस्ते विकासाला केंद्राची मंजुरी, १० कोटींच्या विकासकामांचा मार्ग मोकळा; आमदार दाते सरांच्या पाठपुराव्याला मोठे यश

पारनेर / ता. प्रतिनिधी,  
पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील रस्ते विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. आमदार काशिनाथ दाते सर यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून, केंद्रीय मार्ग निधी योजनेअंतर्गत पारनेर तालुक्यातील चार महत्त्वाच्या रस्त्यांच्या सुधारणांसह एका पुलाच्या बांधकामासाठी प्रस्तावित असलेल्या एकूण १० कोटी रुपयांच्या विकासकामांना केंद्र शासनाची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे गेल्या काही काळापासून प्रयत्नशील असलेल्या या कामांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
या मंजूर कामांमध्ये टाकळी ढोकेश्वर-कान्हूर पठार रस्त्यावरील सबस्टेशनच्या पुढील बाजूस असलेल्या लहान पुलाचे पोहोचमार्गासह बांधकाम करण्यासाठी १ कोटी ५० लाख रुपये, कौठा-अनगरे-आर्वी- अजनुज ते वाळवणे राज्य मार्ग क्र. ६९ ला जोडणाऱ्या रस्त्याच्या सुधारणेसाठी ३ कोटी रुपये, पारनेर-जामगाव-भाळवणी रस्त्याच्या सुधारणेसाठी २ कोटी ७५ लाख रुपये, तर भाळवणी-गोरेगाव-किन्ही-कान्हूर-वडगाव दर्या-दरोडी-रांधे-अळकुटी-चोंभुत रस्त्याच्या सुधारणेसाठी २ कोटी ७५ लाख रुपये मंजूर झाले आहेत.
विशेष म्हणजे, भाळवणी गावातून नगरच्या दिशेने जाणारा तसेच टाकळी ढोकेश्वरच्या दिशेने जाणारा अशा दोन्ही महत्त्वाच्या रस्त्यांसाठी एकूण ५ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद झाल्याने या परिसरातील दळणवळण व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे.
या विकासकामांमुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची गुणवत्ता सुधारण्याबरोबरच शेतकरी, विद्यार्थी, व्यावसायिक, प्रवासी आणि वाहनचालकांना सुरक्षित व सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. गावागावांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या विकासातून परिसराच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीलाही चालना मिळणार आहे.
🔶🔶🔶🔶🔶🔶
 केवळ आश्वासनांपुरते मर्यादित न राहता, आवश्यक त्या विकासकामांसाठी शासनाच्या विविध स्तरांवर सातत्याने पाठपुरावा करून ती प्रत्यक्षात आणली, संबंधित कामांना मंजुरी दिल्यामुळे केंद्रीय रस्ते व दळणवळण मंत्री नितीनजी गडकरी, खासदार पार्थ पवार, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांसह पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील या सर्वांचे विशेष आभार. 
– आ. काशिनाथ दाते सर
(विधानसभा सदस्य)
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments